कचरा संकलनाची समस्या दूर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST2021-06-16T04:32:59+5:302021-06-16T04:32:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : निपाणी नगरपालिकने १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या वाहनांमुळे शहरातील कचऱ्याची ...

कचरा संकलनाची समस्या दूर होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : निपाणी नगरपालिकने १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या वाहनांमुळे शहरातील कचऱ्याची समस्या दूर होणार आहे. यासाठी पालिकेने ३७ लाख निधीतून एकूण ११ वाहने खरेदी केली आहेत, अशी माहिती मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. सोमवारी पालिकेने खरेदी केलेल्या वाहनांचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या.
यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यसह नगरसेवक व नगरसेविका, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. आयुक्त महावीर बोरनवर यांनी स्वागत केले.
मंत्री जोल्ले म्हणाल्या की, निपाणी शहरातील कचरा संकलन करण्यासाठी नवीन वाहनांची गरज होती. काही कारणाने वाहने दाखल होण्यास विलंब झाला आहे. कित्येक जुनी वाहने कालबाह्य झाली आहेत. यामुळे कचरा संकलनास अडचण होती. पण आता ही अडचण दूर होणार आहे.
खासदार जोल्ले, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष नीता बागडे, नगरसेवक राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, दादाराजे देसाई यांच्यासह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
फोटो :
निपाणी : पालिकेत दाखल झालेल्या वाहनांचे उद्घाटन मंत्री जोल्ले, खासदार जोल्ले यांच्या उपस्थितीत झाले.