विश्ववारणा पब्लिक स्कूलमध्ये बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:28 IST2021-02-25T04:28:55+5:302021-02-25T04:28:55+5:30
नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील विश्ववारणा पब्लिक स्कूलचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना ...

विश्ववारणा पब्लिक स्कूलमध्ये बक्षीस वितरण
नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील विश्ववारणा पब्लिक स्कूलचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. संस्थापक कॅप्टन गणपतराव घोडके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी सचिव डी. पी. पाटील, व्यवस्थापक दीपक महाडिक, यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ. अभिजीत इंगवले, चावरेचे माजी उपसरपंच अमरसिंह शिंदे, वारणेचे संचालक सुभाषराव जाधव, फारणेवाडीचे सरपंच रामराव देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाशराव साळुंखे, मनोहर पाटील, व्ही. डी. पाटील, डॉ. दीपिका आदी उपस्थित होते.
प्रा. संभाजी पाटील यांनी अहवाल वाचन केले. रोहित पाटील व शंकर काळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रशांत भोसले यांनी आभार मानले.
फोटो ओळी : तळसंदे येथील विश्ववारणा पब्लिक स्कूलच्या बक्षीस वितरणप्रसंगी संस्थापक कॅप्टन गणपतराव घोडके, सचिव डी. पी. पाटील, व्यवस्थापक दीपक महाडिक, डॉ. अभिजीत इंगवले आदी उपस्थित होते.