कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेडसगाव येथे खासगी सुरक्षा रक्षक तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:48+5:302021-04-28T04:24:48+5:30
भेडसगावामध्ये १ एप्रिलपासून आजअखेर २२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी तीन रुग्ण बरे झाले असून उर्वरित १९ रुग्णांवर ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेडसगाव येथे खासगी सुरक्षा रक्षक तैनात
भेडसगावामध्ये १ एप्रिलपासून आजअखेर २२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी तीन रुग्ण बरे झाले असून उर्वरित १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गावातील कोरोनाची ही संसर्ग साखळी तोडण्यासाठी मंगळवारपासून गावात पाच खासगी सुरक्षा रक्षकांची तुकडी तैनात करून गावात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. संचारबंदी काळात नागरिकांकडून शासन नियमांचे उल्लघंन होऊ नये म्हणून हे सुरक्षा रक्षक गावात विशेष लक्ष ठेवणार आहेत . तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्यावर दडांत्मक कारवाईही या सुरक्षा रक्षकांकडून करण्यात येणार आहे.
गावात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी ग्रामपंचायत व स्थानिक कोरोना दक्षता समितीने धोरणात्मक पाऊल उचलत ही खासगी सुरक्षा रक्षकांची तुकडी तैनात केली असल्याची माहिती सरपंच अमरसिंह पाटील यांनी दिली.
फोटो ओळी :
भेडसगाव येथे ग्रामपंचायतीच्यावतीने तैनात करण्यात आलेले खासगी सुरक्षा रक्षक
( छाया : अनिल पाटील , सरूड )