शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील कैदी व कुटुंबीयांची अश्रूंनी झाली गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 15:06 IST

सोलापूरहून आलेला दोन महिन्याचा श्लोक, तैमूर, फलटणहून आलेला सहा महिन्याच्या आर्यन, पाच महिन्यांचा सोफियासह अनेक बालके, मुले-मुली शुक्रवारी पहिल्यांदा कळंबा कारागृहात बंदिवासात आयुष्य घालवत असलेल्या बाबाच्या कुशीची ऊब अनुभवत होते.

कोल्हापूर : सोलापूरहून आलेला दोन महिन्याचा श्लोक, तैमूर, फलटणहून आलेला सहा महिन्याच्या आर्यन, पाच महिन्यांचा सोफियासह अनेक बालके, मुले-मुली शुक्रवारी पहिल्यांदा कळंबा कारागृहात बंदिवासात आयुष्य घालवत असलेल्या बाबाच्या कुशीची ऊब अनुभवत होते. आम्ही कधी रागाला कधी द्वेषाला, कधी आमिषांना, कधी अनैतिक कारणाला बळी पडलो आणि आता बंदिस्त जगात पश्चातापाने होरपळतोय. तुम्ही असे करू नका खूप शिका मोठे व्हा, अशी भावनिक साद घालत बंदिजनांनी आपल्या लहानग्यांची गळाभेट घेतली. बापाच्या मायेला पारखे झालेल्या मुलांना कुशीत घेताना डोळ्यातून वाहणा-या अश्रूंनीच त्यांना न्हाऊ घालत कैद्यांनी प्रेमाने भरवलेला घास त्या क्षणी मुलांसाठीही अमृताहूनी गोड होता.  कळंबा कारागृहाच्यावतीने गेल्या वर्षीपासून कारागृहातील बंदींची कुटूंबिय आणि लहान मुलांच्या गळाभेटीचा उपक्रम घेण्यात येत आहे. याअंतर्गत शनिवारी तिसºयांदा हा गळाभेटीचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रुमख पाहूणे म्हणून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील उपस्थित होते. यावेळी कारागृह अधिक्षक शरद शेळके, वरिष्ट तुरुंगाधिकारी हरीष्चंद्र जाधवर, पी. पी. परदेशी, सी. एस. आवळे,आर. एस. जाधव, जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव उमेशचंद्र मोरे उपस्थित होते. 

मुलांच्या गळाभेटीसाठी सुमारे अडीचशे कैद्यांनी नावनोंदणी केली होती. आपल्या वडिलांना, आईला आणि आजी आजोबांना भेटण्यासाठी आतुर झालेल्या लहानग्यांनी आई व अन्य कुटुंबीयांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून कळंबा कारागृहासमोर हजेरी लावली होती. कैद्यांच्या कुटुंबीयांची व पाल्यांची शहानिशा करून त्यांना कारागृहात सोडले जात होते. आतमध्ये तयार करण्यात आलेल्या मोठ्या मांडवात येताना आपली मुले दिसली की त्यांना घट्ट मिठी मारून कुशीत बसवून घेताना आलेल्या आनंदाच्या, दु:खाच्या आणि पश्चातापाच्या भावनेला अश्रूंनी वाट करून देत कैद्यांनी मुलांसाठी कॅन्टीमधून घेतलेला खाऊ भरवला. 

आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देत आता सांगून काय उपयोग वेळ निघून गेली, असे म्हणत मुलांना मात्र समंजस व्हा, यंदा दहावीचे वर्ष आहे तर अभ्यास नीट कर असा प्रेमळ सल्ला दिला. तर वर्षानुवर्षे बाबांचा चेहराही न पाहिलेली लहान मुले आपल्या शाळेतल्या गमतीजमतीपासून ते एकमेकातील भांडणे, कुटुंबातील अडचणी, तक्रारी अशा गप्पागोष्टींनी मनातल्या भावनांची पोतडीत रिकामी केली. त्यांची अखंड बडबड आणि निरागस चेहरा डोळ्यात साठवून घेत हे बंदीजन मात्र सुख:दुखाच्या भावनांनी अंर्तमुख झाले होते. सत्तरीला आलेले आजोबा दोन वर्षाच्या नातीला पहिल्यांदा पाहत होते,पासष्ठीतले एक बंदी चार वर्षाच्या पणतूचा प्रेमाने पापा घेत होते. दुसरीकडे अजूनही कुटुंबीयांच्या प्रतीक्षेत असलेल्या कैद्यांची नजर आपल्या कुटुंबीयांना पाहण्यासाठी भिरभिरत होती. कारागृह प्रशासनाने कुटुंबीयांसाठी खाऊसह जेवणाची सोय केली होती. मुलं बंदी असलेल्या आई वडिलांच्या ताटात जेवताना गप्पांचा ओघ अखंड सुरू होता. शुक्रवारी एका कैद्याचा वाढदिवस होता त्यानिमित्त त्यांनी सर्व बंदिंच्या कुटुंबीयांना केक दिला. 

प्रिय आईस...या गळाभेट उपक्रमात १० महिला कैदीही होत्या. फसवणूक, हुंडाबळी अशा विविध कारणांनी जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या यातील एका महिला कैदीचा मुलगा बहिणीचा हात दुखावल्याने आईच्या भेटीला येऊ शकला नाही. त्यामुळे त्याने आपल्या भावंडांकडून आईला पत्र पाठवले. बहिणीचे औषध पाणी, पाच हजार रुपयांचा दंड, घराची झालेली दुरावस्था मांडत आईला तु आल्यानंतर आपण कोणकोणत्या गोष्टी करुया याचा जणू सल्लाच देत होता. तुझी खूप आठवण येते...या मायन्यानेच त्याने पत्राची सुरवात केली होती.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा