६० वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:28+5:302021-05-19T04:23:28+5:30

कोल्हापूर : गावातील ६० वर्षांपुढील सर्व व्यक्तींचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. त्याचबरोबर ४५ ते ६० या वयोगटातील व्याधिग्रस्तांचेही लसीकरण ...

Priority should be given to vaccination of persons above 60 years of age | ६० वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करा

६० वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करा

कोल्हापूर : गावातील ६० वर्षांपुढील सर्व व्यक्तींचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. त्याचबरोबर ४५ ते ६० या वयोगटातील व्याधिग्रस्तांचेही लसीकरण पूर्ण होईल याबाबत लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातील लसीकरण कामकाजाच्या आढावासंदर्भात जिल्हा कृती दल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, अधिष्ठता डॉ. एस.एस. मोरे, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, दिव्यांग, ग्राम समितीमधील सक्रिय सदस्य, रेस्क्यू फोर्समधील फ्रंटलाइन वर्कर, बाल कल्याण संकुलगृहातील कर्मचारी, त्याचबरोबर कोविड काळजी केंद्रामधील आरोग्यसेवकांचेही लसीकरण करावे. गावामधील ६० वर्षांपुढील एकही व्यक्ती विनालसीकरण राहणार नाही, याची दक्षता घेऊन त्यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करावे, असेही ते म्हणाले. लसीकरणाचे नोडल अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी माहिती दिली.

--

फोटो १८०५२०२१-कोल-लसीकरण

ओळ : जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या लसीकरण आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, डॉ. योगेश साळे, डॉ. अनिल माळी, डॉ. एस.एस. मोरे, सोमनाथ रसाळ उपस्थित होते.

--

Web Title: Priority should be given to vaccination of persons above 60 years of age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.