शिक्षण समितीच्या अंदाजपत्रकात नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्याला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:22 IST2021-03-25T04:22:34+5:302021-03-25T04:22:34+5:30
कोल्हापूर : नावीण्यपूर्ण योजना व उपक्रम राबविण्यास प्राधान्य देणारे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे सन २०२१- २०२२चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक बुधवारी ...

शिक्षण समितीच्या अंदाजपत्रकात नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्याला प्राधान्य
कोल्हापूर : नावीण्यपूर्ण योजना व उपक्रम राबविण्यास प्राधान्य देणारे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे सन २०२१- २०२२चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक बुधवारी मंजूर करण्यात आले.
प्राथमिक शिक्षण समितीच्या कोल्हापूर शहरात एकूण ५८ प्राथमिक शाळा सुरू असून, १७ शाळांमधून सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू आहेत. या शाळांतून १० हजार ३१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण समतीचे अंदाजपत्रक अव्वल शिलकेसह ५८ कोटी ०४ लाख २१ हजार ९५६ इतके असून, राज्य सरकारकडे प्रस्तावित तरतूद २१ कोटी ०४ लाख २१ हजार ९५६ व मनपाकडे प्रस्तावित तरतूद ३७ कोटींची आहे. उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे हे अंदाजपत्रक सादर केले.
- ठळक तरतुदी -
- दिव्यांग संसाधन कक्षासाठी दहा लाखांची तरतूद
-राजर्षी शाहू समृद्ध अभियान - २.५० लाख
-मॉडेल स्कूल व बाल वाद्यवृंद निर्मिती - २० लाख
-माझे सुंदर हस्ताक्षर अभियान - दोन लाख
- भाषा कौशल्य विकास अभियान - एक लाख
- गणित झाले सोपे अभियान - ६.५० लाख
- ताराराणी स्वसंरक्षण अभियान - ३ लाख
- ई-लर्निंग सुविधा : २० लाख
- सेमी इंग्रजी शाळा - सध्या १७ प्राथमिक शाळा सेमी इंग्रजी असून, आणखी पाच शाळांत ही सुविधा सुरू केली जाईल.
- संगणक : ५८ शाळांसाठी संगणक दिलेत आणखी २५ संगणक देणार.
- शिष्यवृत्ती सराव परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, प्रज्ञाशोध परीक्षा उपक्रम राबविणार