हळदीत मटका अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:27 IST2021-08-19T04:27:58+5:302021-08-19T04:27:58+5:30

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील हळदी येथे मटका अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एकास अटक केली तर तिघांवर गुन्हा नोंदवला. पोलिसांनी ...

Print on the yellow pot stand | हळदीत मटका अड्ड्यावर छापा

हळदीत मटका अड्ड्यावर छापा

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील हळदी येथे मटका अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एकास अटक केली तर तिघांवर गुन्हा नोंदवला. पोलिसांनी या कारवाईत २८९० रुपयांसह मटक्याचे साहित्य जप्त केले.

दोन दिवसांपूर्वी राधानगरी रोडवर कांडगाव येथे विजय पाटील याच्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ११ जणांना अटक करून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले होते, तर मंगळवारी रात्री पुन्हा हळदी येथे कल्याण मटका सुरू असल्याची माहिती मिळाल्याने करवीर पोलिसांनी छापा टाकून विश्वास सखाराम कांबळे (वय ४९, रा. भीमनगर, हळदी) याला अटक केली. त्याशिवाय निवास परशुराम पाटील (रा. हळदी), सचिन पाटील (रा. केर्ली, ता, करवीर) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी २८९० ची रोकड जप्त केली.

Web Title: Print on the yellow pot stand