घोटवडेत पेट्रोलपंपावर छापा
By Admin | Updated: July 12, 2017 00:44 IST2017-07-12T00:44:01+5:302017-07-12T00:44:01+5:30
घोटवडेत पेट्रोलपंपावर छापा

घोटवडेत पेट्रोलपंपावर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
भोगावती : घोटवडे (ता. राधानगरी) येथील एस्सार पेट्रोलियम कंपनीच्या बालाजी पेट्रोलपंपावर मंगळवारी दुपारी ठाणे क्राईम ब्रँचच्या पथकाने छापा टाकला. यावेळी पेट्रोलमध्ये पाच लिटरमागे ३० मिलीपेक्षा विधीग्राह्य तूट कमी असल्याने व विक्रीतील तफावतीच्या कारणावरून पेट्रोल पंप दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राधानगरी तालुक्यातील ही पहिलीच कारवाई आहे.
ठाणे क्राईम ब्रँच आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या कारवाईत ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाजन, सुरेश चव्हाण, विलास तोडकर, विनायक लुगडे, अरविंद महाजन, अंकुश भोसले, सुरेश यादव, संतोष सुर्वे, प्रशांत मोरके यांनी भाग घेतला.
५ लिटरमागे विधीग्राह्य तूट ३० मिलीपेक्षा कमी
पाच लिटरमागे विधीग्राह्य तूट ३० मिलीपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. ही तूट पुनर्प्रमाणित करून शून्य मिलीवर जोपर्यंत आणली जात नाही, तोपर्यंत या पंपाचे चारही नोझल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुनर्प्रमाणित प्रक्रिया ही वैधमापन विभाग यांच्यामार्फत केली जाणार आहे.