टेंबलाईवाडीत मटका बुकीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:23+5:302021-09-26T04:27:23+5:30

कोल्हापूर : येथील टेंबलाईवाडीत मटका बुकीवर राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून मटका बुकी एजंट, बुकीचालकासह एकूण १२ जणांवर गुन्हे नोंदवले. ...

Print on Matka Bookie at Tembalaiwadi | टेंबलाईवाडीत मटका बुकीवर छापा

टेंबलाईवाडीत मटका बुकीवर छापा

कोल्हापूर : येथील टेंबलाईवाडीत मटका बुकीवर राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून मटका बुकी एजंट, बुकीचालकासह एकूण १२ जणांवर गुन्हे नोंदवले. छाप्यात रोकडसह मोबाइल संच असा सुमारे पाच हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आली.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे : सर्जेराव दिनकर महेकर (वय ६२), सतीश पांडुरंग महेकर (४०), बाळू राजाराम गोंधळी (६०), मटका बुकी एजंट जितेंद्र विष्णू रेणुके (५० सर्व रा, रा. टेंबलाईवाडी), बुकी चालक निसार अबुसाब सय्यद (५१ रा. महालक्ष्मी कॉलनी, उचगाव), सागर अनंतराव जाधव ( ३१ रा. केव्हीज पार्क, नागाळा पार्क), राजाराम तुळजाप्पा सोनार (५५ रा. उचगाव जकात नाका झोपडपट्टी), रंगराव बाळू महेकर (५० रा. टेंबलाईवाडी), सुरेश सदाशिव परीट (४७ रा. टेंबलाईवाडी), राहू, राजेश पाटील (४४ रा. सुदर्शन कॉलनी, टेंबलाईवाडी), बुकी चालक विशाल बबन कवाडे (रा. राजारामपुरी), जम्या (पूर्ण नाव नाही).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टेंबलाईवाडीमध्ये जितेंद्र रेणुके व मटका मालक विशाल कवाळे हे आपल्या घरात मुंबई मटका जुगाराच्या चिठ्ठ्या देऊन त्यांच्याकडून पैसे घेून खेळ चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यावरून पोलिसांनी छापा टाकला. त्यामध्ये मटका जुगार खेळण्यासाठी आलेल्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली. या छाप्यात १४४५ रुपयेची रोकड, मोबाइल संच, मटक्याच्या चिठ्ठ्या आदी सुमारे पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Print on Matka Bookie at Tembalaiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.