इचलकरंजीत हॉटेलवर छापा
By Admin | Updated: January 13, 2017 00:04 IST2017-01-13T00:04:35+5:302017-01-13T00:04:35+5:30
विक्रीकर विभागाची कारवाई : कागदपत्रे, व्यवहारांची तपासणी

इचलकरंजीत हॉटेलवर छापा
इचलकरंजी : येथील बसस्थानक परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलवर विक्रीकर विभागाने गुरुवारी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत या हॉटेलमधील कागदपत्रे व व्यवहाराची तपासणी सुरू होती.
स्टेशन रोड परिसरातील या हॉटेलवर कोल्हापूर विक्रीकर विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. त्यांनी हॉटेलमधील बिलिंग मशीन, कागदपत्रे ताब्यात घेऊन व्यवहाराची तपासणी सुरू केली. ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
याबाबत सहायक विक्रीकर आयुक्त राजू चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा छापा नियमित तपासणीचा भाग असल्याचे सांगून काही आक्षेपार्ह आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
नियमानुसार विक्रीकर भरणे आवश्यक असताना काही ठिकाणी विक्रीकर चुकविण्याचे प्रकार घडतात. यामुळे या विभागातर्फे छापे टाकून तपासणी केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)