कोल्हापुरात जुगार अड्ड्यावर छापा
By Admin | Updated: July 12, 2015 00:20 IST2015-07-12T00:20:33+5:302015-07-12T00:20:45+5:30
दहा अटकेत

कोल्हापुरात जुगार अड्ड्यावर छापा
कोल्हापूर : टाऊन हॉल परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीन
पानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे
अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकून दहा लोकांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून सुमारे रोख रक्कम, दोन मोटार कार, तीन मोटारसायकली, जुगाराचे साहित्य असा एकूण सहा लाख २६ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संशयित आरोपी सुमित पायगोंडा पाटील (वय २५, रा. आझाद चौक, माळी गल्ली), अनुप रमेश लहुटे (२५, रा. सीता कॉलनी, जैन बोर्डिंगसमोर), राहुल दत्तात्रय जानवेकर (२७, रा. शुक्रवार पेठ, पंचगंगा रोड), सूरज सुभाष पाटील (२४ ), दादासो बाबूराव पाटील (३२), रणजित लालासो पाटील (२६), विक्रम विलास राणे (२६), दीपक शामराव कांबळे (५२), दत्तात्रय शंकर पाटील (३५, सर्व रा. विजय हौसिंग सोसायटी, वडणगे, ता. करवीर), संग्राम मनोहर बराले (२४, रा. विठ्ठल गल्ली, वडणगे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.
टाऊन हॉल परिसरातील आईसाहेब मंदिराच्या पुढील पत्र्याच्या शेडमध्ये शनिवारी तीन पानी जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या दहाजणांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम ५२ हजार ५७०, मारुती स्विफ्ट कार, टाटा नॅनो कार, तीन मोटारसायकली व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.