सावर्डेत जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:23 IST2021-03-15T04:23:56+5:302021-03-15T04:23:56+5:30

पेठवडगाव : सावर्डे (ता. हातकणंगले) येथे शेतात तीन पानी जुगार खेळताना वडगाव पोलिसांनी आठजणांवर कारवाई केली. यावेळी १९ हजार ...

Print on a gambling den in Savarde | सावर्डेत जुगार अड्ड्यावर छापा

सावर्डेत जुगार अड्ड्यावर छापा

पेठवडगाव : सावर्डे (ता. हातकणंगले) येथे शेतात तीन पानी जुगार खेळताना वडगाव पोलिसांनी आठजणांवर कारवाई केली. यावेळी १९ हजार ४६० रुपये, ५ मोबाईल, २ मोटारसायकल असा ५० हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली.

याप्रकरणी प्रवीण दिलीप वड्डर (वय २६), जगन्नाथ गणपती कुरणे (४५), केरबा गुडा खाडे (७४), आनंदा जगू कांबळे (४२), नेमीनाथ भरमा लाटकर (५७), मारुती बंडा सुतार (४७), अमर महादेव चव्हाण (३७), कुमार वसंत कांबळे (४५, सर्व रा. सावर्डे) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. याबाबत फिर्याद पोलीस शिपाई शीतल जाधव यांनी दिली. तपास पोलीस हवालदार दीपक पोळ करीत आहेत.

Web Title: Print on a gambling den in Savarde