शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

अट्टल गुन्हेगार कळंबा कारागृहातच गिरवितात प्राथमिक धड

By admin | Updated: July 17, 2014 00:16 IST

बनतेय गुन्हेगारांचं विद्यापीठ : अनेक सराईतांची कबुली, पोलीसही चक्रावले; अंकुश ठेवणार तरी कसा ?े

एकनाथ पाटील - कोल्हापूरखून, चोरी, चेन स्नॅचिंग कसे करायचे, पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांची फिरकी कशी घ्यायची, न्यायालयात कसे बोलायचे, आपले नेटवर्क वाढविण्यासाठी परजिल्ह्यांतील गुन्हेगारांशी कसा संपर्क ठेवायचा, याचे धडे आता नवख्या गुन्हेगारांना कळंबा मध्यवर्ती कारागृहात मिळत आहेत. त्यामुळे हे कारागृह ‘गुन्हेगारांचे विद्यापीठ’ म्हणून ओळखले जात आहे. धडे देणारे दुसरे-तिसरे कोणी नसून गंभीर गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले ज्येष्ठ कैदी शिक्षकाची भूमिका निभावत आहेत. पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या अनेक सराईत गुन्हेगारांनी याची कबुली दिल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत. १९९१ मध्ये या कारागृहाला मध्यवर्ती कारागृहाचा दर्जा देण्यात आला. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दरोडा, घरफोडी, अपहरण, खंडणी, आदी विविध गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या कैद्यांना या कारागृहात ठेवले जाते. मुंबई, ठाणे, कल्याण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी ठिकाणचे सुमारे १७८० कैदी या ठिकाणी शिक्षा भोगत आहेत. सुमारे ३२ एकरांमध्ये हे कारागृह पसरलेले आहे. येथील सर्वसोयीनियुक्त११ बरॅकमध्ये कैद्यांना ठेवण्यात येते. याठिकाणी शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांच्यात चांगले परिवर्तन घडावे, यासाठी कारागृह प्रशासन सर्व स्तरांवर प्रयत्न करत असते. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांपासून कळंबा कारागृहातील वातावरण पूर्णपणे बदलल्याची चर्चा आहे. या ठिकाणी कैद्यांमध्ये दोन गट पडले असून, त्यांच्यात वर्चस्ववादातून अनेकवेळा मारहाणीचे प्रकार घडले आहेत. गल्लीत, चौकात भाईगिरी दाखविणारे कैदी आता कारागृहातही आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. या ‘दादा’, ‘भार्इं’ना कारागृहातील काही अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे समजते. बरॅक बदलण्यापलीकडे कारागृह प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी शहरात खून, घरफोडी, अपहरण, लूटमार प्रकरणातील काही आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कारागृहात राहून आम्ही एकमेकांचे मित्र बनल्याचे व त्यानंतर बाहेर पडल्यानंतर एकमेकांशी संपर्क साधून पुन्हा गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरी कशी करायची, पोलिसांनी पकडल्यानंतर पोलिसांचीच फिरकी कशी घ्यायची, याचे सर्व शिक्षण कळंबा कारागृहात अनुभवी कैद्यांकडून मिळते. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे वेगवेगळ्या गुन्ह्यांतील आरोपींची भेट कारागृहात होत असल्याने त्यांचे नेटवर्क पक्के बनते. त्यामुळे किरकोळ आरोपी हा कारागृहातून बाहेर पडताना अनुभवी डिग्री घेऊनच बाहेर पडत आहेत.४१९९१ मध्ये कारागृहाला मध्यवर्ती कारागृहाचा दर्जा४सुमारे ३२ एकरांमध्ये हे कारागृह पसरलेले ४सुमारे १७८० कैदी या ठिकाणी शिक्षा भोगत आहेत४येथील ११ बरॅकमध्ये कैद्यांना ठेवण्यात येते ४कैद्यात सध्या दोन गट पडले असून, त्यांच्यात वाद४ बरॅक बदलण्यापलीकडे त्यांच्यावर कारवाई नाहीकारागृहात कैद्यांमध्ये दोन गट नाहीत. काही असंतुष्ट कैदी कारागृहाची विनाकारण बदनामी करत आहेत. कैदी एकत्र आल्यानंतर त्यांच्यात जे काही बोलणे होते ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. - सतीश सोनवणे, वरिष्ठ कारागृह अधिकारी