बोरगाव खूनप्रकरणी तपास पथकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:45+5:302021-03-26T04:23:45+5:30
पन्हाळा : बोरगाव येथील महिलेच्या खुनाचा कसोशीने शोध लावणाऱ्या पन्हाळा पोलीस ठाण्यातील तसेच शाहूवाडीतील कर्तव्यदक्ष पोलिसांचा गौरव पोलीस उपअधीक्षक ...

बोरगाव खूनप्रकरणी तपास पथकांचा गौरव
पन्हाळा : बोरगाव येथील महिलेच्या खुनाचा कसोशीने शोध लावणाऱ्या पन्हाळा पोलीस ठाण्यातील तसेच शाहूवाडीतील कर्तव्यदक्ष पोलिसांचा गौरव पोलीस उपअधीक्षक आर.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये पोलीस निरीक्षक अंबऋषी फडतरे, सहायक फौजदार एकनाथ गावंडे, पोलीस नाईक अशोक पाटील, विलास जाधवर, किशोर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकास केर्लेकर, वैभव जाधव, बाजीराव चौगुले, संग्राम शिंदे या पोलिसांनी तसेच मार्गेवाडी (गगनबावडा ) येथील नागरिकांनी विशेष सहकार्य केल्याने खून करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. पन्हाळा पोलिसांनी खुन्यास अटक केल्याबद्दल शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच शाहूवाडी पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलिसांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
२५ पन्हाळा पोलीस
फोटो------- पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याचा तत्परतेने तपास करून गुन्हेगारांना अटक केलेल्या पोलिसांचा शाहूवाडी पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.