शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

पर्यावरण ऱ्हास अर्थव्यवस्थेस बाधक

By admin | Updated: February 3, 2017 00:39 IST

एच. एम. देसरडा : शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे चर्चासत्र

कोल्हापूर : भारतीय अर्थव्यवस्था ही पर्यावरणावर आधारित आहे. मात्र, सध्या पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास अर्थव्यवस्थेला बाधक ठरणारा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी गुरुवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. आर. जी. दांडगे होते. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रूरल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित चर्चासत्राचा विषय ‘निश्चिलनीकरण आणि केंद्रीय अर्थसंकल्प’ असा होता. प्रा. देसरडा म्हणाले, नोटाबंदी नव्हे, तर नोटा बदली झाली आहे. सरकारचा नोटाबंदीचा डाव फसला आहे. आपल्या देशाचा समता मूलक शाश्वत विकास झाला पाहिजे, तरच देशाची अर्थव्यवस्था सुधारणार आहे. नोटाबंदीमुळे सध्या बँक व्यवस्था ढासळली आहे. अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी, स्मार्ट इंडिया योजनांना कमी महत्त्व दिले आहे. ठरावीक कंपन्यांना मोठे करण्याचा सरकारचा उद्देश आहे. प्रा. दांडगे म्हणाले, नोटाबंदीचे आपल्यावर काही दूरगामी परिणाम होतात का ? हे पहावे लागणार आहे. कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कविता वड्राळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शशिकांत पंचगल्ले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)डिजिटलचा बडेजाव करणारी दिशादृष्टीनोटाबंदीच्या सावटाखाली प्रस्तुत केलेल्या अर्थसंकल्पाची दिशादृष्टी ज्या डिजिटल पद्धतीचा बडेजाव, कॅशलेसचा गवगवा करणारी आहे, ही गोरगरिबांच्या हिताची नसल्याचे मत प्रा. देसरडा यांनी वार्तालापमध्ये व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षाने हा वार्तालाप आयोजित केला होता. त्यात प्रा. देसरडा म्हणाले, अर्थसंकल्पातील तथ्यांचा बारकाईने विचार केला असता देशातील सामान्य जनतेला काही विशेष लाभ मिळेल असे जाणवत नाही. या कार्यक्रमास सुनीलकुमार सरनाईक, संभाजीराव जगदाळे, बाबूराव कदम, मधुकर हरेल, अजित सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.