शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
2
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
3
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
5
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
6
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
7
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
8
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
9
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
10
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
11
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
12
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
13
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
14
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
15
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
16
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
17
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
18
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
19
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
20
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संचालकांचा मोर्चासाठी दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:56 IST

कोल्हापूर : निषेध मोर्चासाठी माणसे गोळा करण्यासाठी ‘ गोकुळ ’चे संचालक गावोगावी फिरत असून, ते उत्पादकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, बाळासाहेब कुपेकर, बाबासाहेब देवकर, किरणसिंह पाटील यांनी पत्रकातून केला. हिंमत असेल तर दूध दरवाढीबाबत गावोगावी उत्पादकांचे मतदान घ्यावे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.दूध उत्पादकांवरील ...

कोल्हापूर : निषेध मोर्चासाठी माणसे गोळा करण्यासाठी ‘गोकुळ’चे संचालक गावोगावी फिरत असून, ते उत्पादकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, बाळासाहेब कुपेकर, बाबासाहेब देवकर, किरणसिंह पाटील यांनी पत्रकातून केला. हिंमत असेल तर दूध दरवाढीबाबत गावोगावी उत्पादकांचे मतदान घ्यावे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.दूध उत्पादकांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आमदार सतेज पाटील यांनी केले. पण दूध दराबाबत न बोलता आमदार पाटील यांच्यावर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम संचालकांचा सुरू आहे. दरवाढीच्या मोर्चासाठी जिल्ह्याच्या काना-कोपºयांतून शेतकरी सहभागी झाल्याने संचालकांचे धाबे दणाणले. हा मोर्चा त्यांच्या जिव्हारी लागल्याने ७ डिसेंबरला निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला दूध उत्पादक येतील की नाही, याबाबत शंका असल्याने संचालक संघाच्या स्कार्पिओ गाड्या उधळत गावोगावी मिटिंग घेत आहेत. संघातील खर्च कमी करण्याची आम्ही मागणी केली पण त्याकडे दुर्लक्ष करत संचालक नेहमीच्या रूबाबातच वावरत आहेत. किमान या वेळेला तरी संचालकांनी स्वत:च्या गाड्या वापरणे संयुक्तिक होते. उत्पादकांच्या भल्यासाठी आमदार पाटील यांनी लढा उभा केला आहे, त्याला पाठबळ देण्याची भूमिकाच उत्पादक घेतील. पन्हाळा-बावड्यातील दूध उत्पादकांच्या मेळाव्यात मोर्चाला येणार नसल्याचे उत्पादकांनी ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांना सांगितले. त्यावरून उत्पादकांना दर कपात मान्य नाही, हेच सिद्ध होते. संचालकांनी कितीही दबाव आणला तरी स्वाभिमानी उत्पादक दबावाला अजिबात बळी पडणार नाहीत, ते सतेज पाटील यांच्या पाठीशी ठाम राहतील, असे पत्रकात म्हटले आहे.गांधीगिरीने संचालकांचे स्वागत करादोन रुपये दर कपात केले त्याच्या समर्थनार्थ निषेध मोर्चा काढण्यासाठी सहभागी होण्यासाठी संचालक तुमच्या दारात येत आहेत. त्यांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी पद्धतीने स्वागत करा. आम्हाला खात्री आहे, या मोर्चाला जिल्ह्यातील स्वाभिमानी उत्पादक येणार नसल्याचे पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Politicsराजकारण