शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धमक्यांचे प्रेशर बंद करण्यासाठी ‘प्रेशर कुकर’ पुढील बटन दाबा, आमदार सतेज पाटील यांनी केले आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 15:18 IST

कोल्हापूर : लोकसभेला ‘४०० पार’चा नारा देणाऱ्यांना मतदारांनी नाकारल्यानंतर बहिणीसह सर्वजण लाडके झाले. त्यातही यांचे नेते पदरचे देत असल्याप्रमाणे ...

कोल्हापूर : लोकसभेला ‘४०० पार’चा नारा देणाऱ्यांना मतदारांनी नाकारल्यानंतर बहिणीसह सर्वजण लाडके झाले. त्यातही यांचे नेते पदरचे देत असल्याप्रमाणे गुर्मीची भाषा वापरून महिलांना धमक्या देतात. विरोधकांच्या धमक्यांचे हे प्रेशर कायमचे बंद करण्यासाठी ‘प्रेशर कुकर’ पुढील बटन दाबा आणि राजेश लाटकर या आपल्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला आमदार बनवा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.जुना बुधवार पेठ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला महिलांची अलोट गर्दी झाली होती. सभेत बोलताना, उत्तरचे उत्तर हे फक्त राजू लाटकर आणि प्रेशर कुकर आहे, असे आमदार सतेज पाटील म्हणताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना अनुमोदन दिले.संविधान बदलण्याचा प्रयत्न, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार, बदलापूरची घटना, महिलांचा अवमान, महागाईचा कडेलोट, सर्वसामान्यांची लूट, असे किती कारनामे या सरकारचे सांगायचे. अशावेळी राज्यातील १३ कोटी जनतेने निर्णय घेतला आहे की, गद्दारी करून सत्तेवर आलेल्या या भ्रष्ट सरकारला येत्या २० तारखेला हद्दपार करायचे आहे, असे पाटील म्हणाले.शहराचा शाश्वत विकास घडविण्याबरोबरच पेठापेठातील नियोजनबद्ध कामे करण्यासाठी माझ्यासारख्या महापालिकेत काम केलेल्या कार्यकर्त्याला तुमचे मतदान द्या आणि मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या, असे आवाहन राजेश लाटकर यांनी केले.यावेळी संजय पवार, विजय देवणे, धनंजय सावंत यांची भाषणे झाली. विद्या घोरपडे यांनी आभार मानले. यावेळी आर. के. पोवार, सचिन चव्हाण, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, प्रतिज्ञा उत्तुरे, जय पटकारे, सतीशचंद्र कांबळे, सुशील भांदिगरे, विजय सावंत, बाबासाहेब देवकर, चंदा बेलेकर, प्राचार्य टी. एस. पाटील, रजनीकांत सरनाईक, स्वाती काळे, भारती पोवार, विनायक क्षीरसागर, बाबासाहेब देवकर, दिलीप पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024