राष्ट्रपती पोलिस पदक यशवंत व्हटकरना जाहीर
By Admin | Updated: January 26, 2017 00:45 IST2017-01-26T00:45:02+5:302017-01-26T00:45:02+5:30
कोल्हापूरचे सुपुत्र व राज्य पोलिस मुख्यालयातील सहायक पोलिस उपमहानिरीक्षक

राष्ट्रपती पोलिस पदक यशवंत व्हटकरना जाहीर
कोल्हापूर : कोल्हापूरचे सुपुत्र व राज्य पोलिस मुख्यालयातील सहायक पोलिस उपमहानिरीक्षक यशवंत नामदेव व्हटकर यांना पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले.
यशवंत व्हटकर मूळचे कोल्हापुरातील जवाहरनगर येथील. ते सन १९८३ मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदी रूजू झाले. मुंबई पोलिस दलात विविध ठिकाणी काम करताना त्यांनी महत्त्वपूर्ण गुन्हे उघडकीस आणले आहेत. मुंबईतील गँगवारविरोधी मोहीम, एन्काउंटरमध्ये सहभागी होते. १६ हून अधिक मोक्काचे गुन्हे तसेच रेल्वे बॉम्बस्फोट, आझाद मैदान दंगलीचा तपास त्यांनी यशस्वीपणे केला. व्हटकर यांनी ‘खात्यातील अनुभव’, ‘गुन्हेगाराच्या मागावर’, ‘संरक्षणाय खलनिग्रहणाय’ व ‘सत्यमेव जयते’ ही पुस्तके लिहिली आहेत. ते ‘दक्षता’ मासिकाचे सहसंपादक आहेत. (प्रतिनिधी)