शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींचा कोल्हापूर दौरा पुढे गेला, यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 13:50 IST

कोल्हापूर : कोल्हापूरसह पुणे व राज्यात सुरू असलेली अतिवृष्टी, महापुराच्या परिस्थितीमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात ...

कोल्हापूर : कोल्हापूरसह पुणे व राज्यात सुरू असलेली अतिवृष्टी, महापुराच्या परिस्थितीमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या कार्यालयातून राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबतचे पत्र शुक्रवारी सायंकाळी पाठविण्यात आले. राष्ट्रपतींचा दौरा सध्या तरी रद्द झाल्याने तयारीत गुंतलेल्या सर्वच शासकीय यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला. आता त्यांना कोल्हापुरातील पूरस्थितीवर लक्ष केंद्रित करता येणार आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या २८ ते ३० तारखेदरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होत्या. त्यांचा सर्वात पहिला दौरा रविवारी काेल्हापुरात होता. यादिवशी त्या अंबाबाईचे दर्शन घेऊन वारणानगर येथील कार्यक्रमाला जाणार होत्या. त्यांच्या दौऱ्यानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ असे तलाठ्यापासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंतची यंत्रणा तयारी गुंतली होती. त्यात गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. महापुराच्या उंबरठ्यावर असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतर, त्यांचा निवारा, आरोग्याच्या सोयी, चहा, नाष्टा, जेवणासह सर्व सोयी पुरवण्यासाठी यंत्रणेची धावपळ सुरू होती. दुसरीकडे राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या नियोजनाच्या बैठका, तयारीमध्ये मोठी यंत्रणा गुंतली होती; पण आता दौरा पुढे गेल्याने यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPresidentराष्ट्राध्यक्ष