चार राष्ट्रांच्या समूह वर्धापनदिनी संभाजीराजेंची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:24 IST2021-03-18T04:24:51+5:302021-03-18T04:24:51+5:30
परस्परांमधील सांस्कृतिक व राजकीय संबंध वृद्धिंगत व्हावेत, या उद्देशाने या चार राष्ट्रांनी एकत्र येत १९९१ साली या ग्रुपची स्थापना ...

चार राष्ट्रांच्या समूह वर्धापनदिनी संभाजीराजेंची उपस्थिती
परस्परांमधील सांस्कृतिक व राजकीय संबंध वृद्धिंगत व्हावेत, या उद्देशाने या चार राष्ट्रांनी एकत्र येत १९९१ साली या ग्रुपची स्थापना केली. नुकतीच या ग्रुपच्या स्थापनेस ३० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने दिल्ली येथे या चारही राष्ट्रांच्या दूतावासांनी संयुक्तपणे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास खासदार संभाजीराजे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. संभाजीराजे यांनी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहून चारही राष्ट्रांना शुभेच्छा दिल्या.
१७०३२०२१ कोल संभाजीराजे
यावेळी या कार्यक्रमास युरोपीयन युनियनचे भारतातील राजदूत उगो अस्टुटो, पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोवस्की,
हंगेरीचे राजदूत अँड्रस् किरली, स्लोव्हाकियाचे राजदूत इव्हान लँकारिक, झेक प्रजासत्ताकचे राजदूत मिलान होवोर्का यांच्यासह परराष्ट्र मंत्रालयाचे पश्चिम सचिव विकास स्वरूप, परराष्ट्र मंत्रालयाचे आर्थिक संबंध विभागाचे सचिव राहूल छाब्रा, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे महासंचालक दिनेश पटनाईक उपस्थित होते.