बाप्पांच्या विसर्जनाची तयारी युद्धपातळीवर

By Admin | Updated: September 7, 2014 00:43 IST2014-09-07T00:41:42+5:302014-09-07T00:43:58+5:30

२२ सीसीटीव्ही कॅमेरे : ४ एलईडी स्क्रीन

Preparing for the immersion of the paparazzi on the battlefield | बाप्पांच्या विसर्जनाची तयारी युद्धपातळीवर

बाप्पांच्या विसर्जनाची तयारी युद्धपातळीवर

कोल्हापूर : भक्ती, उत्साह आणि बंधुभाव यांचा त्रिवेणी संगम घडवून आणणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता उद्या, सोमवारी होत असून आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्याची तयारी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच सुरू केली आहे. प्रशासकीय पातळीवर कोल्हापूर महानगरपालिकेने बाप्पांच्या विसर्जनाची, तर पोलीस दलाने मिरवणुकीतील बंदोबस्ताची जय्यत आखणी केली आहे. तथापि, या तयारीच्या कामावर गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने काही मर्यादा आणल्या आहेत. विसर्जन मिरवणूक सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी करवीरवासीयांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाला सुरुवात झाली तशी पावसानेही पुन्हा आपली हजेरी लावली आहे. त्यामुळे गणेशभक्तांची काहीशी निराशा झाली. काल, शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस अखंडपणे सुरूच असल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाचा जोर असाच राहिला, तर दोन दिवसांत भाविक बाहेर पडतील की नाही अशी शंकाच आहे.
उद्या, सोमवारी गणेश विसर्जन मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे. सर्व मंडळांबरोबरच संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष सोमवारच्या मिरवणुकीकडे लागले आहे. विसर्जन मिरवणुकीच्या तयारीच्या निमित्ताने महानगरपालिकेची यंत्रणा गेल्या चार दिवसांपासून कामाला लागली आहे. सर्वप्रथम मनपा प्रशासनाने मिरवणूक मार्गावर मुरूम आणि खडीच्या सहायाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. दोन दिवसांत टाकलेला मुरूम पावसाच्या पाण्याने भिजला असून, त्यामुळे रस्ते अधिकच खराब व दलदलीचे बनले आहेत. सतत पाऊस कोसळत असतानाही महापालिका पवडी, विद्युत शाखेचे त्याचबरोबर महावितरणचे कर्मचारी मिरवणुकीच्या तयारीत गुंतले आहेत.
मिरवणूक मार्गावरील आडव्या येणाऱ्या विजेच्या तारा उंचीवर नेऊन जोडल्या आहेत. त्याचबरोबर नेहमीचे सोडियम दिवे वगळून जादा दिवे लावण्यात आले आहेत. पंचगंगा घाट व इराणी खण येथेही जादा पथदिवे लावण्यात आले आहेत. इराणी खण व त्याच्या शेजारच्या खणीत मूर्ती विसर्जित करण्याची सोय करण्यात आली असून, नव्या खणीच्या काठावर एक मोठा सिमेंटचा कठडा निर्माण करण्यात आलेला आहे.

Web Title: Preparing for the immersion of the paparazzi on the battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.