वेळप्रसंगी व्यापाऱ्यांसोबत रस्त्यावरील आंदोलनास तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:30 IST2021-07-07T04:30:50+5:302021-07-07T04:30:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोल्हापूर व इचलकरंजी शहरातील व्यापाऱ्यांची दुकाने सुरू करण्यासंदर्भात भेदभाव करणे चुकीचे आहे. प्रशासनाने आसपासच्या ...

वेळप्रसंगी व्यापाऱ्यांसोबत रस्त्यावरील आंदोलनास तयार
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोल्हापूर व इचलकरंजी शहरातील व्यापाऱ्यांची दुकाने सुरू करण्यासंदर्भात भेदभाव करणे चुकीचे आहे. प्रशासनाने आसपासच्या सर्वच शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे. तसेच व्यापारी असोसिएशनला पाठिंबा असून वेळप्रसंगी व्यापाऱ्यांसोबत रस्त्यावरील आंदोलनास तयार असल्याचे मत, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
इचलकरंजी शहरातील व्यापारी प्रतिनिधींची माजी खासदार शेट्टी यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. इनामप्राणित व्यापारी असोसिएशनच्या मागणीनुसार शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी नाकारल्याने त्यांच्यात असंतोष होता. या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी पालिकेत सोमवारी (दि. ५) बैठक घेतली. आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडूनही शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. तसेच विविध संघटना व आजी-माजी खासदार, आमदार यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी संघटनांनी ३ दिवस प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले.