शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात उमटणार मंजूळ स्वर, ध्वनी यंत्रणा उभारण्याची तयारी

By भारत चव्हाण | Updated: January 2, 2025 16:44 IST

'हेरिटेज' खांबामुळे मंदिराचे सौंदर्यही खुलणार

भारत चव्हाण

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी प्रत्येकवर्षी लाखो भाविक येत असतात. या भाविकांचे मंदिराच्या परिसरात आगमन होताच मन प्रसन्न व्हावे, त्यांच्या कानावर देवीच्या स्तोत्राचे मंजूळ स्वर पडावेत, दर्शनाचे एक आध्यात्मिक समाधान लाभावे म्हणून नवीन वर्षात मंदिर परिसरात ध्वनी यंत्रणा उभारली जात आहे. एक महिन्याभरात ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून देवीच्या गाण्यांचे स्वर भाविकांच्या कानावर पडणार आहेत.देशभरातील अनेक प्रमुख देवस्थानच्या तसेच मंदिरांच्या परिसरात ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून भक्तिगीते, देवीचे स्तोत्र, आरती लावली जात आहे. तिरुपती देवस्थानमार्फत तिरुमला डोंगरावर बालाजीचे गीत ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून लावले जाते. त्यामुळे भाविकांचा थकवा दूर होऊन मन प्रफुल्लित होते. आध्यात्मिक समाधानही लाभत असते. भाविक सर्व संसारिक विवंचना विसरून भक्तिरसात तल्लीन होऊन जातात.हाच अनुभव आता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांना येणार आहे. राज्यभरातून तसेच देशभरातील अनेक राज्यांतून अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. कोल्हापूरकरही देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. त्यांना मंदिर परिसरातील दोनशे ते तीनशे मीटर परिघात देवीचे स्तोत्र, आरती, भक्तिगीते भाविकांना ऐकायला मिळणार आहेत.त्यासाठी ध्वनी यंत्रणेचे १२० खांब उभारण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. याशिवाय १६९ हेेरिटेज पद्धतीचे खांब उभारले जात आहेत. येत्या महिन्यात खांब उभारणे, त्यावर ऐतिहासिक पद्धतीचे बल्ब लावणे, ध्वनी यंत्रणा कार्यान्वित करणे ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सर्व यंत्रणा प्रत्यक्ष कार्यान्विन होईल.ध्वनीयुक्त खांब उभारणीचे काम मुंबईतील कृष्णा रेफ्रिजरेशन कंपनीला देण्यात आले असून, या कंपनीने अयोध्या येथील राम मंदिर, मधुरा यासह मुंबईत अशा पद्धतीचे काम केले आहे. तर हेरिटेज बल्बचे खांब उभारण्याचे काम पवन क्वीक सर्व्हिसेस कंपनीला देण्यात आले आहे. वॉर्मव्हाइट बल्ब या खांबांवर बसविले जाणार असून, त्यामुळे मंदिर परिसराचे सौंदर्यही खुलणार आहे.येथे उभारणार ध्वनीयुक्त खांबबिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, मोहन रेस्टॉरंट, जोतिबा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भवानी मंडप, करवीरनगर वाचन मंदिर, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी या परिसरात ध्वनीयुक्त खांब उभारले जात आहेत.मूळ कल्पना क्षीरसागर यांचीराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची ही मूळ कल्पना आहे. त्यासाठी त्यांनी ध्वनीयुक्त खांबांसाठी २ कोटी ६५ लाखांचा, तर हेरिटेज खांबांसाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त करून आणला आहे.‘देवस्थान समिती’कडे नियंत्रणहे काम जरी महापालिकेमार्फत केले जात असले तरी त्यावर दैनंदिन देखभाल व नियंत्रण देवस्थान समितीकडे देण्यात येणार आहे. दुरुस्ती असेल तर ते महापालिका पाहणार आहे. यासाठी नियंत्रण कक्षासाठी जागा मंदिर परिसरात असेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर