शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जोतिबा चैत्र यात्रेची तयारी युद्धपातळीवर

By admin | Updated: April 6, 2017 16:20 IST

रस्ते रुंदीकरणासह मंदीर रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ६ : दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रशासन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, स्थानिक समिती व ग्रामपंचायत यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. यात मुख्य मार्गावरील रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, लोखंडी रेलिग, रंगरंगोटी आदीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.यंदाचा यात्रेचा मुख्य दिवस (दि. १०) सोमवारी आहे. यासाठी संपुर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि गोवा आदी ठिकाणाहून ७ लाखाहून अधिक भाविक जोतिबा डोंगर येथे येण्याची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने विशेषत: शहर वाहतुक शाखेने जोतिबा डोंगर परिसरात ६० हजाराहून अधिक वाहनांसाठी वाहनतळ निर्माण केला आहे. या तळाचे सपाटीकरण व रुंदीकरणही अंतिम टप्प्यात आले आहे. याशिवाय गिरोली फाटा, दाणेवाडी, गायमुख तलावाजवळील पडीक, शेतातील जागा, जोतिबा डोंगरावरील पिराचा कडा, यात्री निवास, जुने शासकीय विश्रामगृह, व्यापारी संकुल, यमाई बाग, आदी परिसरात वाहनतळाची जागा सपाटीकरण व रुंदीकरण काम सुरु आहे. यातील बहुतांशी काम पुर्णत्वाकडे आले आहे. जोतिबा डोंगर परिसरातील मंदीराकडे जाणारे रस्ते रुंदीकरण व डांबरीकरण ही अंतिम टप्प्यात आले आहे. सेंट्रल प्लाझा येथील दोन्ही बाजूचे मुख्य गेटजवळील डांबरीकरण व बॅरेकेटींगचे कामही पुर्णत्वाकडे आले आहे. मंदीराजवळील नगारखाना दक्षिण दरवाजाकडील काही दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसरही मोकळा श्वास घेऊ लागला आहे. मंदीर परिसरातील दर्शन रांग तीन पदरी ऐवजी दुपदरी करण्यात आली आहे. त्यामुळे सासनकाठ्या नाचवण्यासाठी भाविकांना आणखी जागा उपलब्ध झाली आहे. यात्रा काळात लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदीर प्रशासनाने १६ सी. सी. टिव्ही कॅमेरे बसविले आहेत. याशिवाय भक्तांना जोर्तीलिंगाचे दर्शन बाहेरुनच मिळावे याकरीता ६ मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत. या संस्था भाविकांच्या सेवेसाठी सज्जसहजसेवा ट्रस्ट, व्हाईट आर्मी, यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय डॉक्टरांचे पथक, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पथक, अनिरुद्ध उपासना संस्थेचे स्वंयसेवक तसेच दुचाकी बंद पडल्यास ती त्वरीत दुरुस्त करुन देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशन आदी भाविकांच्या सेवेत असणार आहेत. मोफत अन्नछत्राची सोयसहजसेवा ट्रस्ट, आर.के.मेहता चॅरिटेबल ट्रस्ट, सावकार प्रेमी गु्रप यांच्यावतीने ८ ते १२ मार्च दरम्यान भाविकांना मोफत अन्नछत्राची सोय करण्यात आली आहे. सहजसेवा ट्रस्टच्यावतीने गायमुख येथे ५ पाण्याच्या मोठ्या टाक्या व मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर जोतिबा बसस्थानकाशेजारी आर. के.मेहता ट्रस्टतर्फे अन्नछत्रासाठीचा मंडप घालण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे. गुलाल खोबऱ्याची उधळण जोतिबाला प्रिय असे गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते. यासाठी विशेष राजापुरी खोबरे लागते. तर गुलालासाठी खास सरपंच गुलालालाही विशेष मागणी आहे. याकरीता १७५ टन राजापुरी सुके खोबरे, तर १८ लाखाहून अधिक नारळांची आवक या काळात अपेक्षित आहे. तर गुलालाचीही तीनशे टनाहून अधिक उधळण केली जाते. याशिवाय जोतिबा ला प्रिय असा ‘दवणा ’ ही वाहिला जातो. हाही लाखो रुपयांचा दवण्याची शेतीही केवळ पन्हाळा तालुक्यातील केखले गावातच केली जाते. गुलाल खोबरे व नारळ आणि दवणा यांचीची मोठी उलाढाल अपेक्षित आहे. प्रसाद, पुजेचे साहित्य, खेळणी आदींची दुकानेही यात्रेसाठी सज्ज झाली आहेत. वजन मापांचीही तपासणीयात्राकाळात भाविकांची पुजेचे साहित्य विक्रेत्यांकडून फसवणुक होऊ नये म्हणून वजनमाप नियंत्रण विभागाकडून तपासणी केली जात आहे. यासाठी विशेष म्हणून वजनांचे योग्य मुल्यमापन मोहिम हाती घेण्यात आली आहे. शुल्क भरुन योग्य ते वजन कॅलिब्रेशन करुन दिले जात आहे. जोतिबाला वाहण्यासाठी केवळ राजापुरी खोबरे वाटी लागते. यासाठी किमान १७५ टनाहून अधिक खोबरे विक्री केले जाते. तर गुलालही तीनशे टनाहून अधिक उधळला जातो. याशिवाय १८ लाखाहून अधिक नारळाची आवक या काळात होते. -गजानन डवरी, पुजेचे साहित्य विक्रेते