शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jyotiba Temple: चैत्र पौर्णिमेच्या यात्रेची तयारी, पन्हाळा येथे पार पडली प्रशासकीय आढावा बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 11:05 IST

श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्र पौर्णिमेची यात्रा सोहळा एप्रिल महिन्यात संपन्न होत आहे. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात,आंध्र प्रदेश आदी राज्यातून पाच ते सात लाखांहून अधिक भाविक डोंगरावर येतात.

पन्हाळा : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्र पौर्णिमेची यात्रा सोहळा एप्रिल महिन्यात संपन्न होत आहे. या निमित्ताने यात्रा नियोजनाच्या कामांचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पन्हाळा येथील नगर परिषद सभागृहात तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली शाहूवाडी प्रांताधिकारी अमित माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली यात्रा योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक संपन्न झाली.

जोतिबाची चैत्र यात्रा होणार की नाही याचे शासकीय आदेश अद्याप आले नसले तरी यात्रा होणार या दृष्टिकोनातून यात्रेची तयारी सुरु केल्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी सांगीतले. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात,आंध्र प्रदेश आदी राज्यातून पाच ते सात लाखांहून अधिक भाविक डोंगरावर येतात. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी,  यात्रा काळात भाविक आणि ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आतापासून जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने तयारी सुरू केली आहे.भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत तहसीलदार शेंडगे यांनी दिल्या. ज्या विभागातील कर्मचारी यात्रा नियोजनामध्ये कमी पडतील, दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही तहसीलदार शेंडगे यांनी दिला. यात्रेच्या वेळी डोंगरावर येणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती, अतिक्रमण पार्किंग, आरोग्यसेवा, स्वच्छता,लाईट, पाणी सुविधा, सुरक्षितता, दर्शन रांगा, सासनकाठ्यांची उंची, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी कामाविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

बैठकीस पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक दीपक मेहेत्तर, वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड, गटविकास अधिकारी तुळशीराम शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनील कवठेकर यांच्यासह जिल्हा व तालुका प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा