देखाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

By Admin | Updated: September 8, 2016 00:27 IST2016-09-08T00:20:07+5:302016-09-08T00:27:52+5:30

राजारामपुरी, उद्यमनगरात तांत्रिक देखावे : युवक मित्र मंडळाची प्लास्टिकच्या कचऱ्यापासून इंधन निर्मिती

Preparation of the scene in the final stage | देखाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

देखाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणाचा यक्षप्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून संशोधक या कचऱ्यापासून इंधननिर्मितीचा प्रयत्न करीत आहेत. असाच प्रयोग पुनर्प्रक्रियेच्या माध्यमातून डॉ. मेधा ताडपत्रीकर व शिरीष फडतरे यांनी शोधला आहे. या प्रयोगाचे सादरीकरण गणेशोत्सवानिमित्त राजारामपुरी अकरावी गल्ली येथील युवक मित्र मंडळाने सादर केले आहे.
एव्हरेस्ट असो वा कुंभमेळा, कन्यागत महापर्व; सगळीकडे एकच समस्या, ती म्हणजे प्लास्टिक कचरा होय. आता तुम्ही म्हणाल, यात नवीन काय आहे? प्लास्टिक कचरा कायम होतच राहणार आहे. मात्र, प्लास्टिक १००० वर्षे तरी टिकून राहते. त्याचा निचरा किंवा विघटन होत नाही. ते निसर्गाला, माणसांना, प्राण्यांना हानीकारक आहे. त्यातून नद्या, समुद्र प्रदूषित होतात. निरनिराळे आजार, नाले तुंबणे, आदी समस्यांना आताही व यापुढेही सर्वांना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापुरातील डॉ. मेधा ताडपत्रीकर व शिरीष फडतरे यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेच्या माध्यमातून कायमचा इलाज करणारे तंत्रज्ञान शोधले आहे. याचा प्रयोग राजारामपुरी अकरावी गल्ली येथील युवक मित्र मंडळाच्या गणेश देखाव्यातून सादर केला आहे. या प्रक्रिया प्रकल्पात पुण्यातील ५५०० कुटुंबे व कॉर्पोरेट कंपन्याही सहभागी झाल्या आहेत. हा देखावा पूर्ण झाला असून बुधवारपासून सर्वांसाठी पाहण्यास खुला झाला आहे.

Web Title: Preparation of the scene in the final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.