वडगावमध्ये आजपासून प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:26 IST2020-12-06T04:26:18+5:302020-12-06T04:26:18+5:30

पेठवडगाव : वडगाव क्रिकेटप्रेमी व मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने वडगावात प्रथमच होणाऱ्या वडगाव प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा आज, ...

Premier League cricket tournament in Wadgaon from today | वडगावमध्ये आजपासून प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा

वडगावमध्ये आजपासून प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा

पेठवडगाव :

वडगाव क्रिकेटप्रेमी व मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने वडगावात प्रथमच होणाऱ्या वडगाव प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा आज, रविवारपासून सुरू होत आहेत.

या प्रीमिअर लीग स्पर्धेत आठ संघ व १३६ खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये सचिन चव्हाण एस. सी. सुपर किंग्ज, संताजी भोसले एम्पायर्स, दुर्गुळे सनरायझर्स, सुरज कुडाळकर ११, संतोष माने चॅलेंजर्स, धनाजी केर्लेकर डी. के. लायन्स, संजय माळी राम रॉयल्स, अंकुश माने वरियर्स, आदी सहभागी होणार आहेत. दररोज ५ मॅच, तर एकूण ३२ सामने होणार आहेत.

या स्पर्धेमध्ये विजेत्याला २५ हजार, उपविजेत्याला १५ हजार, तर १० हजार अशी बक्षिसे आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक धावा, विकेट घेणाऱ्या खेळाडूस ३२ इंची एलईडी टीव्ही, मॅन ऑफ दि मॅच, प्लेअर ऑफ दि मॅच, शिस्तबद्ध संघ, उत्कृष्ट कर्णधार, फायनलसाठी वैयक्तिक बक्षिसे असणार आहेत. यामुळे वडगाव व परिसरातील क्रिकेटप्रेमींना या स्पर्धेमधील मॅचेस मोबाईलवर पाहण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: Premier League cricket tournament in Wadgaon from today