विस्तारीकरणास कोल्हापूरला प्राधान्य
By Admin | Updated: July 3, 2016 00:50 IST2016-07-03T00:50:55+5:302016-07-03T00:50:55+5:30
कें द्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री महेश शर्मा

विस्तारीकरणास कोल्हापूरला प्राधान्य
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या विमानतळ विकसनाच्या नवीन धोरणांतर्गत देशभरात नव्याने उभारावयाच्या तसेच विस्तारी-करणाच्या योजनेमध्ये कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन कें द्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री महेश शर्मा यांनी दिले.
वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (वेसकॉम)चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या प्रश्नांसंबंधी महेश शर्मा यांची दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली. याप्रसंगी ते बोलत होते.
शिष्टमंडळात संदीप भंडारी, बाबूलाल तातेड, प्रवीण शर्मा सहभागी होते. राज्यशासनाच्या सहकार्याने विमानतळ प्राधिकरण महाराष्ट्रातील विमानतळ वापरण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगून अन्य मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करेल, असेही मंत्री शर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणास प्राधान्य दिले जाईल तसेच राज्य शासनाने प्रस्ताव पाठविल्यास विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यास कें द्र सरकारची हरकत असणार नाही असे आश्वासन कें द्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री महेश शर्मा यांनी दिले आहे.
-ललित गांधी, अध्यक्ष, वेसकॉम