राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रीती चव्हाण हिची निवड
By Admin | Updated: November 12, 2014 23:58 IST2014-11-12T20:46:07+5:302014-11-12T23:58:56+5:30
तिने मुंबई, ठाणे, सांगली, कऱ्हाड, आदी ठिकाणी क्रॉसकंट्री स्पर्धेमध्ये बक्षिसे मिळविली

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रीती चव्हाण हिची निवड
इचलकरंजी : येथील गंगामाई गल्सर्् हायस्कूलची विद्यार्थिनी प्रीती शिवाजी चव्हाण हिची बालेवाडी येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी (क्रॉस कंट्री) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यापूर्वी प्रीतीने शालेय शासकीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यामुळे तिची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिने मुंबई, ठाणे, सांगली, कऱ्हाड, आदी ठिकाणी क्रॉसकंट्री स्पर्धेमध्ये बक्षिसे मिळविली आहेत. तिला क्रीडाप्रमुख शेखर शहा, अरुण कोष्टी व राजेंद्र गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)