तेरवाड येथील आंदोलकांना अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST2021-01-03T04:26:27+5:302021-01-03T04:26:27+5:30
कुरुंदवाड : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड बंधाऱ्याला बांधून घातल्याप्रकरणी भूमिगत असलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना अटकपूर्व ...

तेरवाड येथील आंदोलकांना अटकपूर्व जामीन
कुरुंदवाड : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड बंधाऱ्याला बांधून घातल्याप्रकरणी भूमिगत असलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. आंदोलकांच्यावतीने अॅड. कागवाडे यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी अॅड. कागवाडे यांचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार केला. मात्र, संशयित आरोपी पोलिसांत अद्याप हजर झाले नाहीत. पंचगंगा नदी प्रदूषणामुळे गत आठवड्यात नदीपात्रातील मासे मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे दूषित पाण्याची पाहणी करून पंचनामा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी हरबड यांना संतप्त स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी तेरवाड बंधाऱ्यावर दोरखंडाने बांधून घातले होते. त्यामुळे अधिकारी हरबड यांनी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील (रा. हेरवाड), विश्वास बालीघाटे (रा. शिरढोण) यांच्यासह पाच कार्यकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा म्हणून कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.