शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

कोल्हापुरात उद्या नाताळनिमित्त सर्व चर्चमध्ये प्रार्थना, गाण्यांचे, सामाजिक उपक्रमांचेही आय़ोजन

By संदीप आडनाईक | Updated: December 25, 2023 11:34 IST

शहर आणि जिल्ह्यात उद्या, सोमवारी मोठ्या उत्साहात नाताळ साजरा होत आहे.

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात उद्या, सोमवारी मोठ्या उत्साहात नाताळ साजरा होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच सर्व चर्चमध्ये देशाच्या शांततेसाठी, आरोग्यासाठी यावेळी विशेष प्रार्थना, भक्ती, उपासना, गाण्यांचे तसेच विविध सामाजिक उपक्रमांचेही आय़ोजन  करण्यात आले आहे. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस (२५ डिसेंबर) सर्वत्र नाताळ सण म्हणून साजरा केला जातो. डिसेंबर महिना सुरू झाला की, सर्वत्र नाताळच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारित गाणी, नाटिका कार्यक्रमातून सादर केल्या जातात.

नाताळच्या पूर्वसंध्येला सर्वत्र झगमगाट आहे. सर्वात जुन्या आणि इतरही चर्चवर तसेच शहरातील दुकाने, इमारती, मॉल्सवर आकर्षक विद्यूत रोषणाई, सजावट करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात आठ ते दहा प्रमुख चर्च आहेत. शहरातील वायल्डर मेमोरियल चर्च,ख्राईस्ट चर्च,सेंव्हथ डे चर्च, ऑल सेंटस चर्च, होली इव्हॅजलिस्ट चर्च, ब्रम्हूपूरी, विक्रमनगर ख्रिस्ती समाज चर्चसह सर्वच लहान मोठ्या चर्चमधून नाताळनिमित्त आज ख्रिस्त जन्माचा सोहळा आणि प्रार्थना केल्या जाणार आहे. कॅडल लाईट सर्विसचेही आय़ोजन केले आहे. याशिवाय इतरत्रही प्रार्थनासभा होत असतात. जिल्ह्यात ख्रिस्ती बांधवांची संख्या मोठी आहे. 

गेल्या तीन दिंवसापासून ख्रिस्ती वसाहती व घरांमधून कॅरोल सिंगिगची धूम सुरु आहे. नाताळची गाणी गात तरुण,तरुणीचे ग्रुप घरोघरी भेट देत आहेत.घरोघरी केक, डोनट आणि विविध गोड पदार्थ बनविण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात वातावरण नाताळमय झाले आहे. बाजारपेठही नाताळच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. विविध बेकरी हॉटेल्स, इमारती, मॉल्स, रेस्टॉरंटमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सांताक्लॉजचे मुखवटे आणि ख्रिसमस ट्री लाऊन त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. आठवडाभर नाताळचे कार्यक्रम, विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम सुरू राहणार आहेत. अनाथ मुलांना, रुग्णांना फळे आणि खाऊवाटप, साड्या वाटप आदी उपक्रमांचे आयोजन केले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChristmasनाताळ