प्रवीण निकम ‘अरुणभैया श्री’
By Admin | Updated: March 17, 2015 00:05 IST2015-03-16T22:49:17+5:302015-03-17T00:05:59+5:30
पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव स्पर्धेत ८0 किलो वजनी गटात

प्रवीण निकम ‘अरुणभैया श्री’
वाळवा : येथील अरुणभैया हेल्थ क्लबतर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव स्पर्धेत ८0 किलो वजनी गटात सांगलीच्या प्रवीण निकम याने ‘अरुणभैया श्री २0१५’ पुरस्कार पटकावला. सांगली जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने शुक्रवारी वाळवा येथील हुतात्मा चौकात या स्पर्धा घेण्यात आल्या.या गटात सुनील पुजारी, जयवंत देवकुळे, प्रताप खाडेकर (सर्व सांगली) अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले. ६0 किलोखालील गटात महंमद बेपारी (सांगली), विजय शिंदे (कोल्हापूर), बाजीराव घोलप (सातारा), बापूसाहेब आष्टेकर (कोल्हापूर) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे यश मिळविले. ६0 ते ६५ किलोखालील गटात निशांत साळुंखे (सातारा), अक्षय दांडेकर, युवराज मोरे (कोल्हापूर), सुजित कदम (सांगली) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचे यश मिळविले.६५ ते ७0 किलोखालील गटात रियाज पठाण (सांगली), अभिजित जाधव, अवधूत कुंभार (सांगली), ऋषिकेश खामकर (कोल्हापूर) यांनी, ७0 ते ७५ किलोखालील गटात अजिंक्य रेडेकर (कोल्हापूर), राहुल जाधव (सांगली), विनायक रेडेकर (कोल्हापूर), मनोहर लाड (सांगली) यांनी, ७५ ते ८0 किलोखालील गटात विशाल कांबळे (सांगली), सागर संकपाळ (कोल्हापूर), भारत माने, श्रीयुत पाटील (दोघेही सांगली) यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे अनुक्रमे ‘अरुणभैया श्री २0१५’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे बक्षीस व मानाचा पट्टा मिळविला. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण नामदेवराव मोहिते, माजी आ. विनय कोरे, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, भीमराव माने, भाजप प्रदेश युवा कार्यकारिणीचे उपाध्यक्ष विक्रम पाटील, इस्लामपूर नगरसेवक कपिल ओसवाल, नजीर वलांडकर, पलूस तालुका काँग्रेसचे जे. के. बापू जाधव, इस्लामपूरचे वैभव पवार, दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी केले. पंच म्हणून बिभीषण पाटील , रामकृष्ण चितळे, अरुण मोरे, रवींद्र आरते ‘भारत श्री’, सुहास व्हटकर यांनी काम पाहिले. प्रकाश निकम व सचिन थोरात यांनी स्टेज मार्शल म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे संयोजन क्लबचे अध्यक्ष मोहसिन चाऊस, गजानन नायकवडी, अभिजित शिंदे, विष्णू भोसले आदींनी केले. (वार्ताहर)