प्रवीण चौगुले, अमृत देशमुखसह ९६ जणांना उपअधीक्षकपदी बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:21 IST2020-12-25T04:21:06+5:302020-12-25T04:21:06+5:30

यापूर्वी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सेवा बजावलेले अधिकारी अमृत देशमुख यांची पुणे ग्रामीण मुख्यालयात उपअधीक्षक म्हणून बढती झाली. दिनकर मोहिते ...

Praveen Chowgule, Amrit Deshmukh and 96 others were promoted as Deputy Superintendents | प्रवीण चौगुले, अमृत देशमुखसह ९६ जणांना उपअधीक्षकपदी बढती

प्रवीण चौगुले, अमृत देशमुखसह ९६ जणांना उपअधीक्षकपदी बढती

यापूर्वी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सेवा बजावलेले अधिकारी अमृत देशमुख यांची पुणे ग्रामीण मुख्यालयात उपअधीक्षक म्हणून बढती झाली. दिनकर मोहिते यांची मुंबईला, कोल्हापूरच्या नागरी हक्क संरक्षण समितीचे निरीक्षक डॅनियल जॉन बेन यांची लातूरला उपअधीक्षकपदी बढतीने बदली झाली. शाहूपुरी, शाहूवाडीसह जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात सेवा बजावलेले निरीक्षक प्रवीण चौगुले यांची सोलापूर रेल्वे उपविभागात उपअधीक्षक म्हणून बढती झाली. निरीक्षक संजय कुरुंदकर यांची पुण्यातून मुंबईला सहायक आयुक्तपदी बढती झाली. सयाजी गवारे यांची पुण्यातच गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे उपाअधीक्षकपदी बढती झाली. त्याशिवाय लक्ष्मीपुरीत सेवा बजावलेले अरुण वायकर यांची पुण्यातून साकोली (भंडारा) येथे उपाअधीक्षकपदावर बढतीने बदली झाली आहे, अशा ९६ जणांना बढती मिळाली आहे.

Web Title: Praveen Chowgule, Amrit Deshmukh and 96 others were promoted as Deputy Superintendents