मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रशांत सातपुते यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:18 IST2021-01-09T04:18:59+5:302021-01-09T04:18:59+5:30

कोल्हापूर : येथील जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते ...

Prashant Satpute felicitated by the Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रशांत सातपुते यांचा सत्कार

मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रशांत सातपुते यांचा सत्कार

कोल्हापूर : येथील जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते मुंबई येथे सत्कार करण्यात आला. सातपुते यांनी बेळगाव येथील मराठी पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. याबद्दल हा सत्कार करण्यात आला.

सातपुते हे गतवर्षी बेळगाव येथे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मराठी पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली होती. कर्नाटकमध्ये तेथील शासनाच्या नियम आणि अटींचे पालन करत पत्रकारिता करणे अवघड आहे. त्यामुळे किमान या मराठी पत्रकारांना महाराष्ट्र शासनाकडून अधिस्वीकृती पत्रिका मिळावी, यासाठी विभागीय अधिस्वीकृती समितीने तीन वर्षांपूर्वी राज्य समितीकडे मागणी केली होती. अखेर याबाबतचा निर्णय होऊन प्रातिनिधीकरित्या क्रांती हुद्दार आणि बबिता पवार यांना अधिस्वीकृती पत्रिका प्रदान करण्यात आल्या.

याचा पाठपुरावा केल्याप्रकरणी यावेळी सातपुते यांचा हा सत्कार करण्यात आला. त्यांना उपसंचालक अनिरुध्द अष्टपुत्रे, संचालक गोविंद अहंकारी, संचालक अजय अंबेकर, महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे मार्गदर्शन लाभले.

०८०१२०२१ कोल प्रशांत सातपुते

कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते मुंबई येथे सत्कार करण्यात आला.

Web Title: Prashant Satpute felicitated by the Chief Minister