शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांतने मृत्यूनंतरही दिले चौघांना जीवनदान; हृदय, फुफुस, किडन्या केल्या दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 17:14 IST

प्रशांतला ब्रेन स्ट्रोक आला. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण २३ जूनला त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.

मुरगूड : मुरगूड ता. कागल येथील तरुण पण सद्या जयपूरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या प्रशांत राजेंद्र शिंदे (वय ३७) या तरुणाने मृत्यू नंतरही चार जणांना जीवनदान मिळवून दिले आहे. प्रशांतच्या ब्रेन डेड नंतर त्याच्या अवयवांचे दान करण्यात आले. प्रशांतच्या हृदय हे जयपूर मधील एका महिलेवर प्रत्यारोपण करण्यात आले आहे. शिवाय दोन्ही किडन्या, फुफुस ही अन्य रुग्णासाठी दिल्याने चार जणांना जीवनदान मिळाले आहे. यामुळे शिंदे कुटुंबियाचे कौतुक होत आहे.सामान्य परीस्थितीत जन्मलेला प्रशांत हा जयपूर येथील एल.अँड.टी या कंपनीत इंजिनिअर म्हणून सेवेत होता. त्याची पत्नी दोन मुली आणि तो जयपूरला होते. तर आई, वडील, भाऊ मुरगूड येथे राहत आहेत. १८ जूनला प्रशांतला ब्रेन स्ट्रोक आला. त्यावेळी तेथील खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण २३ जूनला त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.यावेळी तेथील डॉक्टरांनी प्रशांतचे वडील राजेंद्र शिंदे व पत्नी नयना शिंदे यांना अवयव दानाविषयी विचारले. प्रशांतने ही आपल्या पत्नी जवळ व कंपनीतील मित्राजवळ अवयव दानाविषयी चर्चा केली होती. आपला अकाली मृत्यू झाला तर आपल्या अवयवांचे दान करावे अशी इच्छा त्यांने व्यक्त केली होती. त्यामुळे तात्काळ दोघांनी ही अवयव दानास होकार दर्शवला. त्यानंतर रुग्णालयात सर्व तयारी केली. त्यानुसार प्रशांत च्या दोन्ही किडन्या, हृदय, आणि फुफुस यांचे वेगवेगळ्या चार रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले.या निर्णयामुळे अवयव मिळण्यासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या चार रुग्णांना जीवनदान मिळाले. रुग्णालय प्रशासनाने २४ जूनला प्रशांतचा मृतदेह कुटूंबियाच्या ताब्यात देताना रुग्णालय आवारातून अंत्ययात्रा काढली आणि कुटुंबियांचे आभार मानले. त्यानंतर पुण्यापर्यंत विमानाने आणि तेथून मोटारीने आज, शनिवारी पहाटे त्याचा मृतदेह मुरगूड गावी आणण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रशांतच्या स्मृती चिरंतनप्रशांतचे वडील राजेंद्र शिंदे यावेळी बोलताना म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीतुन प्रशांत आज चांगल्या कंपनीत नोकरीस होता. अचानक दुःख कोसळले पण त्याने अगोदर मित्र व त्याच्या पत्नी जवळ अवयव दानाची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे आपण सर्वांनी हा निर्णय घेतला. आमचा मुलगा कायमचा आमच्यापासून दूर गेला पण त्याच्या अवयवाच्या रूपाने आठवणी मात्र चिरंतन राहतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर