शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

Kolhapur: प्रशांत कोरटकरला अंडा सेलमध्ये ठेवले, कारागृहातही पोलिसांची करडी नजर

By सचिन यादव | Updated: April 3, 2025 12:45 IST

दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पहारा

सचिन यादवकोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या प्रशांत मुरलीधर कोरटकरवर कारागृह प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. दिवसरात्र सहाहून अधिक कर्मचारी त्याच्यावर नजर ठेवून आहेत. दहा सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून त्याच्या प्रत्येक हालचालीवर देखरेख ठेवली जात आहे. दिवसभराच्या दिनक्रमात तो इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांचे वाचन करीत असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याबद्दल कोरटकरला अटक केली आहे. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनुसार, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानुसार त्याची रवानगी कळंबा कारागृहात केली आहे. गेले चार दिवस तो कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे.

कारागृहात दोन विशेष अंडा सेल आहेत. त्यामध्ये एका भागात मुंबई, सोलापूर येथील सहा गँगस्टरला ठेवले आहे. तर दुसऱ्या भागात प्रशांत कोरटकरला ठेवले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कळंबा कारागृह अलर्ट झाले असून, त्याच्यावर विशेष नजर ठेवली जात आहे. अंडा सेलमध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तर या सेलकडे जाण्याच्या मार्गावर सहा सीसीटीव्ही आहेत. रात्रंदिवस अंडा सेलमध्ये कारागृह पोलिसांचा राउंड आहे. त्यातून कोरटकरच्या सर्व हालचालींवर नजर ठेवली जात आहे.

कारागृहाचा दिनक्रम सकाळी सहा वाजता सुरू होतो. सकाळी राष्ट्रगीत झाल्यानंतर कैद्यांना चहा, दूध आणि नाष्टा दिला जातो. त्यानंतर कैद्यांना काम दिले जाते. नऊ वाजता त्यांच्या आवडीनुसार वाचनासाठी वेळ दिला जातो. दुपारी बारा ते तीन विश्रांती आणि त्यानंतर पुन्हा नियोजित वेळापत्रकानुसार कामकाज चालते. अंडा सेलच्या कैद्यांसाठी हाच दिनक्रम असतो. कोरटकर सकाळच्या सत्रात मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांचे वाचन करत आहे. त्याने मागणी केल्यास वाचनासाठी पुस्तके देण्याची तयारी कारागृह प्रशासनाने दर्शविली आहे.

भेटण्याची इच्छा दर्शविली नाहीगेल्या चार दिवसांत कोरटकरने कोणालाही भेटण्याची इच्छा दर्शविलेली नाही. तूर्त तरी त्याच्या भेटीसाठी कोणी आलेले नसल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले.

अंडा सेलमधील कैद्यावर विशेष नजर ठेवली जाते. सहाहून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. त्यात कोरटकरवरही विशेष लक्ष आहे. -नागनाथ सावंत, वरिष्ठ कारागृह अधीक्षक, कळंबा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPrisonतुरुंगPoliceपोलिस