बेळगावचा प्रशांत खन्नूरकर ‘निपाणी श्री’

By Admin | Updated: April 8, 2015 00:28 IST2015-04-08T00:01:58+5:302015-04-08T00:28:49+5:30

शरीरसौष्ठव स्पर्धा : १५० स्पर्धकांचा सहभाग

Prashant Khannaurkar of Belgaum 'Nipani Shree' | बेळगावचा प्रशांत खन्नूरकर ‘निपाणी श्री’

बेळगावचा प्रशांत खन्नूरकर ‘निपाणी श्री’

निपाणी : येथील बॉडी बिल्डर्स असोसिएशन व ज्वोल्ले उद्योग समूहातर्फे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावचा प्रशांत खन्नूरकर ‘निपाणी श्री’चा मानकरी ठरला. म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर झालेल्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सहकारनेते आण्णासाहेब ज्वोल्ले, आमदार शशिकला ज्वोल्ले व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
७५ किलोपेक्षा अधिक वजनी गटात ‘एसएसएसएफ’चा सिद्धू देशनूर, ७५ किलो वजनी गटात ‘एमएलआयआरसी’चा प्रशांत खन्नूरकर, ७० किलो वजनी गटात ‘एमएलआयआरसी’चा अमर पाटील, ६५ किलो वजनी गटात ‘एमएलआयआरसी’चा प्रवीण मजूकर, ६० किलो वजनी गटात ‘एमएलआयआरसी’चा विनोद मेत्री, ५५ किलो वजनी गटात गोल्ड जीमचा जयदेव देसाई व निपाणी गाव मर्यादित गटात सिद्धार्थ हेल्थ क्लबचा माणिक घाटगे यांनी यश संपादन केले.
स्पर्धेत १५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. परीक्षक म्हणून अजित सिद्दण्णावर, सुनील आपटेकर, एम. के. गुरव, राजेश लोहार, अनिल आंबोल, शेखर जाणवेकर, हेमंत हावळ, अनंत कणकवडे, सुनील राऊत यांनी काम पाहिले.
बेस्ट पोझर म्हणून आशिष भाट (निपाणी), तर जिल्हास्तरीय बेस्ट पोझर म्हणून विनोद मेत्रीची निवड झाली.
कार्यक्रमास नगराध्यक्षा नम्रता कामत, ‘हालशुगर’चे संचालक रामगोंडा पाटील, शहर भाजप अध्यक्ष जयवंत भाटले, नगरसेवक दीपक माने, विजय टवळे, दत्ता जोत्रे, नीता बागडे, पवन पाटील, अविनाश पाटील, जोतिप्रसाद ज्वोल्ले, सुवर्णा पट्टणशेट्टी, विजय राऊत, सद्दाम नगारजी, बॉडी बिल्डर युथ क्लबचे अध्यक्ष रोहित वैद्य, बी. ए. कंकणवाडी, रवी कदम यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते

Web Title: Prashant Khannaurkar of Belgaum 'Nipani Shree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.