मारहाण करून उलट तक्रार देणाऱ्या ग्राहकालाच ‘खाकी’चा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST2021-05-24T04:23:41+5:302021-05-24T04:23:41+5:30

कोल्हापूर : मटण दिले नाही म्हणून ग्राहकाने दुकानदारास बेदम मारहाण करून उलट दुकान उघडे ठेवल्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा ...

Prasad of 'Khaki' only to the customer who complains by beating him | मारहाण करून उलट तक्रार देणाऱ्या ग्राहकालाच ‘खाकी’चा प्रसाद

मारहाण करून उलट तक्रार देणाऱ्या ग्राहकालाच ‘खाकी’चा प्रसाद

कोल्हापूर : मटण दिले नाही म्हणून ग्राहकाने दुकानदारास बेदम मारहाण करून उलट दुकान उघडे ठेवल्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी रविवारी रात्री तक्रार देणाऱ्या ग्राहकास ताब्यात घेऊन त्याला ‘खाकी’चा प्रसाद दिला. प्रकाश बाळकृष्ण सूर्यवंशी (वय ४९, रा. साने गुरुजी वसाहत) असे ताब्यात घेतलेल्या ग्राहकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोहित बिरदेव कोतमिरे (रा. सानेगुरुजी वसाहत परिसर) याने रविवारी सकाळी साने गुरुजी वसाहत परिसरातील आपल्या दुकानात मटणाची विक्री केली; पण प्रकाश सूर्यवंशी या ग्राहकाला मटण मिळाले नाही म्हणून त्याने कोतमिरे याच्याशी वादावादी केली. त्यानंतर बेकायदेशीरपणे मटण दुकान सुरू ठेवल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी कोतमिरे याला दोन हजार रुपये दंड करून पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी खरा प्रकार उघड झाला. मटण न मिळाल्याने प्रकाश सूर्यवंशी याने आपल्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार दुकानदार कोतमिरे याने पोलिसांकडे करून पाठीत मारहाणीचे वळ दाखविले. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत तक्रार देणाऱ्या प्रकाश सूर्यवंशी याला रात्री ताब्यात घेऊन कायद्याचा बडगा दाखविला.

Web Title: Prasad of 'Khaki' only to the customer who complains by beating him