प्रकाश पोवार यांचा शिक्षक सेवाकाळ आदर्शवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:16 IST2021-06-11T04:16:37+5:302021-06-11T04:16:37+5:30

डॉ. डी. वाय. पाटील संकुल येथे संपर्क अधिकारी डॉ. विश्वनाथ भोसले व संजय जाधव यांच्या हस्ते प्रकाश पोवार ...

Prakash Powar's teaching career is ideal | प्रकाश पोवार यांचा शिक्षक सेवाकाळ आदर्शवत

प्रकाश पोवार यांचा शिक्षक सेवाकाळ आदर्शवत

डॉ. डी. वाय. पाटील संकुल येथे संपर्क अधिकारी डॉ. विश्वनाथ भोसले व संजय जाधव यांच्या हस्ते प्रकाश पोवार यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संजय पाटील यांनी ऑनलाइन पद्धतीने पोवार यांना शुभेच्छा दिल्या. पोवार यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या मुख्याध्यापक पदावर भारती बंडू धस यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी छत्रपती राजाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. के. कांबळे, कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका हिरूगडे, कै. यशवंतराव भाऊराव पाटील हायस्कूलच्या मुख्याध्यापिका गौतमी पाटील, मास्टर दीनानाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक केसरकर उपस्थित होते.

फोटो : १० प्रकाश पोवार सत्कार

ओळी कसबा बावडा : श्री गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश भगवान पोवार यांचा सेवानिवृत्तपर सत्कार करताना डॉ. डी. वाय. पाटील संस्थेचे संपर्क अधिकारी डॉ. विश्वनाथ भोसले व संजय जाधव.

Web Title: Prakash Powar's teaching career is ideal