शैक्षणिक कार्यात प्रकाश पाटील यांचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:39+5:302021-05-07T04:25:39+5:30

श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्रा. प्रकाश पाटील यांच्या निवृत्तीनिमित्त सत्कार कार्यक्रमात नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगरुळ शिक्षण संस्थेचे सचिव ...

Prakash Patil's great contribution in educational work | शैक्षणिक कार्यात प्रकाश पाटील यांचे मोठे योगदान

शैक्षणिक कार्यात प्रकाश पाटील यांचे मोठे योगदान

श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्रा. प्रकाश पाटील यांच्या निवृत्तीनिमित्त सत्कार कार्यक्रमात नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगरुळ शिक्षण संस्थेचे सचिव व शिक्षक आ.प्रा जयंत आसगावकर होते.

यावेळी नरके म्हणाले, सांगरूळ शिक्षण संस्थेचा शैक्षणिक व क्रीडा आलेख उंचावण्याचे काम पाटील यांनी केले. अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण करताना गुणवंत विद्यार्थीही तयार केले. आता यापुढील निवृत्तीचा काळ प्रकाश पाटील यांनी आपल्या कुटुंबासाठी व राजकीय कारकीर्दीसाठी द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शिक्षक आ. प्रा जयंत आसगावकर म्हणाले, प्रकाश पाटील यांनी आता कुटुंबासाठी वेळ देताना सामाजिक सामाजिक कार्यातही भाग घ्यावा व सांगरूळ शिक्षण संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करावे. यावेळी वाकरे पोलीस पाटील सुरेश पाटील, राजू मुल्लानी, मुख्याध्यापक भगाटे, संजय पाटील उपस्थित होते.

फोटो

:

श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्रा. प्रकाश पाटील यांचा सेवानिवृत्तनिमित्त माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक आ. प्रा. जयंत आसगावकर, सुरेश पाटील.

Web Title: Prakash Patil's great contribution in educational work