प्रकाश जावडेकर उद्या शिवाजी विद्यापीठात

By Admin | Updated: April 15, 2017 19:22 IST2017-04-15T19:22:52+5:302017-04-15T19:22:52+5:30

नॅचरल प्रॉडक्ट्स केंद्राचे डिजिटल लॉँचिंग

Prakash Javadekar tomorrow at Shivaji University | प्रकाश जावडेकर उद्या शिवाजी विद्यापीठात

प्रकाश जावडेकर उद्या शिवाजी विद्यापीठात

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १५ : राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना (रुसा)च्या अंतर्गत नॅचरल प्रॉडक्टस केंद्राचे (डिजिटल) उद्घाटन उद्या, सोमवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे.

शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, महाराष्ट्र शासनाच्या सचिव मीता राजीवलोचन, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
देशभरातील विविध रुसा केंद्रांचे लॉँचिंग मंत्रिमहोदय नवी दिल्ली येथून डिजिटल पद्धतीने करणार आहेत. तरी या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.

Web Title: Prakash Javadekar tomorrow at Shivaji University