शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आवाडे यांचे बंड: लोकसभा लढण्याची भीती दाखवून विधानसभेचा 'शब्द' घेण्याचा प्रयत्न

By विश्वास पाटील | Updated: April 13, 2024 12:06 IST

मुख्यमंत्र्यांशी होणार आज चर्चा

विश्वास पाटीलकोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मुलाऐवजी स्वत:चीच उमेदवारी जाहीर करून भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी खळबळ उडवून दिली. त्यामागे लोकसभेची भीती दाखवून विधानसभेच्या उमेदवारीचा गुंता सोडवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शनिवारी कोल्हापुरात आहेत. त्यांना भेटीची वेळ दिली असताना त्यांनी त्याच्या आदल्या दिवशीच उमेदवारी जाहीर करून दबाव निर्माण केल्याचे सांगण्यात येते.गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. इचलकरंजीत भाजपचा कमिटेड मतदार आहे. त्यांचा पाठिंबा मिळवायचा तर हात चिन्ह चालणार नाही म्हणून त्यांनी ही चाल खेळली व त्यात ते यशस्वी झाले. निकालानंतर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता ते त्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. परंतु स्थानिक राजकारणात त्यांना अजून भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी पक्षसंघटनेत चंचूप्रवेश करू दिलेला नाही. इचलकरंजीत काही नसताना भाजप मी वाढवला आहे, विधानसभेला दोनवेळा जिंकलो आहे. त्यामुळे २०२४ लाही या जागेवरून मीच लढणार असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे आमदार आवाडे यांची कोंडी झाली आहे. त्यांचा भाजपमधील प्रवेशही अजून झालेला नाही. त्यावरून लोकसभा निवडणुकीसाठी मुलगा राहुल यांचा भाजपकडून फारसा विचारही झाला नाही. त्यामुळे लोकसभेला डरकाळी फोडून त्यातून विधानसभेच्या निवडणुकीतील काही प्रश्न सोडवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आवाडे यांना मानणारा इचलकरंजी शहरासह आजूबाजूच्या गावांत आणि हातकणंगले तालुक्यातही दखल घ्यायला लावणारा मजबूत गट आहे. त्यांच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून जोडलेले नेटवर्क आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या राजकारणात आम्हाला कुणी बेदखल करू नये असाही त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी सुरुवातीलाच महायुतीतील शिंदेसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीस थेट विरोध केला. राहुल आवाडे यांनी कोल्हापुरात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणूक लढवण्याची घोषणाही करून बघितली.

ताकद दाखवण्याचा प्रयत्नखासदार माने यांच्याकडून अजूनही आवाडे यांच्याशी संपर्क साधलेला नाही. मूळ आवाडे-माने घराण्यात पारंपरिक राजकीय वैर आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर व खासदार माने यांच्यातही एकोपा नाही. आमदार विनय कोरे यांची त्यांनी घरी जाऊन भेट घेतली तरी अजूनही ते थेट प्रचारात उतरलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर आपण सक्षम उमेदवार ठरू शकतो, आपले यड्रावकर, कोरे या अपक्ष आमदारांशीही चांगले संबंध असल्याचा व त्यांच्या माध्यमातून ताकद उभी करू शकतो हा मेसेज देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Prakash Awadeप्रकाश आवाडेdhairyasheel maneधैर्यशील माने