शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

Kolhapur: प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके यांना शिंदेसेनेची उमेदवारी जाहीर; राजेश क्षीरसागर वेटिंगवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 12:23 IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत राधानगरी -भुदरगड मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर व करवीर मतदारसंघातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना ...

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर व करवीर मतदारसंघातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना शिंदेसेनेने (एकनाथ शिंदे गट) मंगळवारी उमेदवारी जाहीर केली. शिंदेसेनेने रात्री उशिरा राज्यातील ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात आबिटकर व नरके यांचा समावेश आहे.राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून प्रकाश आबिटकर हे सन २०१४ व २०१९ असे सलग दोनवेळा शिवसेनेकडून निवडून गेले आहेत. शिवसेना फुटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत सत्तेत जाणे पसंत केले. त्याची बक्षिसी म्हणून त्यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली आहे. आबिटकर हे आतापर्यंत तीन विधानसभेच्या निवडणुका लढले आहेत. २००९ च्या निवडणुकीत ते अपक्ष रिंगणात होते. मात्र, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, पुढे सलग दोनवेळा त्यांनी गुलाल घेतला आहे. यंदा ते चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. दुसरीकडे करवीर विधानसभा मतदारसंघातून चंद्रदीप नरके हे शिंदेसेनेकडून रिंगणात उतरणार आहेत. नरके हे २००९ व २०१४ असे दोनवेळा या मतदारसंघांतून विधानसभेवर गेले आहेत. गतनिवडणुकीत काँग्रेसचे स्व. आमदार पी. एन. पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी त्यांची जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे राहुल पाटील यांच्याविरोधात लढत होणार आहे.

राजेश क्षीरसागर वेटिंगवरचकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेकडून आपणालाच उमेदवारी मिळाल्याचा दावा करणारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे नाव शिंदेसेनेच्या पहिल्या यादीत जाहीर झालेले नाही. या मतदारसंघावर भाजपने आक्रमकपणे दावा केला आहे. खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक, सत्यजित कदम यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे सध्यातरी शिंदेसेनेने क्षीरसागर यांना उमेदवारीसाठी वेटिंगवरच ठेवले आहे. पहिल्या यादीत नाव न आल्याने उत्तर मतदारसंघ शिंदेसेनेला की भाजपला याची उत्सुकता अधिक ताणली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४radhanagari-acराधानगरीkarvir-acकरवीरShiv SenaशिवसेनाPrakash abitkarप्रकाश आबिटकर