अंगणवाडी महिलांचा स्तुत्य उपक्रम, परसात पिकवला भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST2021-07-18T04:17:56+5:302021-07-18T04:17:56+5:30
बांबवडे : साळशी (ता. शाहूवाडी) येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परसातील भाजीपाला हा यशस्वी प्रयोग करून त्या भाजीपाल्याचे वाटप गावातील गरोदर ...

अंगणवाडी महिलांचा स्तुत्य उपक्रम, परसात पिकवला भाजीपाला
बांबवडे : साळशी (ता. शाहूवाडी) येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परसातील भाजीपाला हा यशस्वी प्रयोग करून त्या भाजीपाल्याचे वाटप गावातील गरोदर माता व कुपोषित बालकांच्या माता यांना वाटप करण्यात आला.
ग्रामपंचायत साळशी व एकात्मिक बालविकास प्रकल्प पंचायत समिती शाहूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. यासाठी त्यांना सरपंच संदीप, पाटील उपसरपंच प्रकाश पाटील सर्व सदस्य यांनी प्रोत्साहन दिले. उपसरपंच प्रकाश पाटील व अंगणवाडी कर्मचारी यांच्यावतीने गरोदर माता व कुपोषित बालकांच्या माता यांना हा भाजीपाला वाटप करण्यात आला.
या वेळी सेविका मंगल पाटील, वैशाली पाटील, सीमा पाटील, लक्ष्मी बुवा, ग्रामपंचायत सदस्य आनंदा पाटील, सतीश पाटील, सुवर्णा बडे, विष्णुपंत पाटील, शंकर मगदूम, सुंदर पाटील इत्यादी उपस्थित होते.