‘लोकमत’चा रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य - ऋतुराज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:20+5:302021-07-19T04:16:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या काळात राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना ‘लोकमत’ समूहाने संपूर्ण राज्यात रक्तदान चळवळ उभी ...

‘लोकमत’चा रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य - ऋतुराज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या काळात राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना ‘लोकमत’ समूहाने संपूर्ण राज्यात रक्तदान चळवळ उभी करण्याचे केलेले काम निश्चितच स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले.
‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत व ऑयस्टर जैन्सच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी ४० जणांनी रक्तदान तर २७० नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, चेंबर ऑफ काॅमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी, संभवनाथ ट्रस्टचे राजू निंबजीया, जयेश ओसवाल, वनेचंद राठोड उपस्थित होते. ऑयस्टर जैन्स ग्रुपचे अध्यक्ष राहुल राठोड यांनी प्रास्ताविकात ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक करत ‘आयस्टर जैन्स’च्या कार्याचा आढावा घेतला. उपाध्यक्ष भावबळ ओसवाल, सदस्य वैभव ओसवाल, कुंदन ओसवाल, अतिश ओसवाल, सनी सुराणा, भाषण ठक्कर, सिद्धार्थ जैन आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत व ऑयस्टर जैन्सच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ललित गांधी, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, राजू निंबजीया, जयेश ओसवाल, राहुल राठोड आदी उपस्थित हाेते. (फोटो-१८०७२०२१-कोल-राहुल राठोड)