ग्लासगो येथील वेटलिफ्ंिटग स्पर्धेत कांस्य पदक मिळविलेल्या खेळाडूंना घडविणारे प्रशिक्षक प्रदीप पाटील यांचा जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षक म्हणून समाविष्ट करावा,
By Admin | Updated: August 3, 2014 22:43 IST2014-08-03T21:12:51+5:302014-08-03T22:43:30+5:30
केंद्र शासनाचा गुरु द्रोणाचार्य व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळावा

ग्लासगो येथील वेटलिफ्ंिटग स्पर्धेत कांस्य पदक मिळविलेल्या खेळाडूंना घडविणारे प्रशिक्षक प्रदीप पाटील यांचा जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षक म्हणून समाविष्ट करावा,
कुरुंदवाड : येथील पालिकेला १६ कोटी रुपये इतका निधी देणारे गृहराज्यमंत्रीसतेज पाटील यांना राष्ट्रीय नेत्यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा नागरी सत्कार, ग्लासगो येथील वेटलिफ्ंिटग स्पर्धेत कांस्य पदक मिळविलेल्या खेळाडूंना घडविणारे प्रशिक्षक प्रदीप पाटील यांचा जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षक म्हणून समाविष्ट करावा, केंद्र शासनाचा गुरु द्रोणाचार्य व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळावा, असा ठराव येथील पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. यावेळी सभेपुढील दहा विषयांना मंजुरी देण्यात आली.
येथील पालिकेत आज, शुक्रवारी नगराध्यक्ष संजय खोत यांनी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण सभा बोलाविली होती. सभेच्या सुरुवातीला पाणीपुरवठा सभापती माधुरी सावगावे यांनी हर्क्युलस जीमचे वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रदीप पाटील यांचा जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षक म्हणून समाविष्ट करून त्यांना केंद्र शासनाचा गुरु द्रोणाचार्य व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळावा, असा ठराव मांडला. तर रामचंद्र डांगे यांनी सतेज पाटील यांच्या नागरी सत्काराच्या आयोजनाचा ठराव मांडला. या दोन्ही ठरावाला विरोधी पक्ष नेते गणपतराव पोमाजे, दादासो पाटील यांच्यासह सर्वांनीच संमती दिली. यानंतर उपनगराध्यक्ष सुरेश कडाळे यांनी माळीन गावातील दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव मांडला. यळ्ळूर येथे मराठी भाषिकांवरील अन्यायाच्या निषेधाचा ठराव दादासो पाटील यांनी मांडला.यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील, बांधकाम सभापती वैभव उगळे, विलास उगळे, रजिया पठाण, बाबासो भबिरे, त्रिशला पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)