मसोलीत हत्तीकडून पॉवर ट्रिलर पलटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:18 IST2021-07-20T04:18:08+5:302021-07-20T04:18:08+5:30
मसोली (ता. आजरा) येथे हत्तीने धुमाकूळ घालून पॉवर ट्रिलर पलटी केल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. येथील तांबाळे नावाच्या शेतात ...

मसोलीत हत्तीकडून पॉवर ट्रिलर पलटी
मसोली (ता. आजरा) येथे हत्तीने धुमाकूळ घालून पॉवर ट्रिलर पलटी केल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.
येथील तांबाळे नावाच्या शेतात रविवारी (दि. १८) मध्यरात्री हत्तीने सोमनाथ होडगे, संजय होडगे, जानबा ढोकरे, मारुती गुरव आदी शेतकऱ्यांचे तीन एकरातील भात रोप लागणीचे नुकसान केले. यावेळी सोमनाथ होडगे यांचा उभा असेलला पॉवर ट्रिलर पलटी केला.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून मसोली, माद्याळ, हाळोली या गावांत दोन हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. उसासह भातरोप लागणीचे नुकसानही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
त्यात यंत्रांचीही मोडतोड होत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. सततच्या नुकसानीने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
फोटो ओळी : मसोली (ता. आजरा) येथे सोमनाथ होडगे यांच्या शेतात हत्तीने पलटी केलेला पॉवर ट्रिलर.
क्रमांक : १९०७२०२१-गड-०४