शक्तिप्रदर्शनाचा दिल्ली दौरा

By Admin | Updated: December 10, 2014 00:02 IST2014-12-10T00:00:40+5:302014-12-10T00:02:20+5:30

५३ नगरसेवकांचा सहभाग : महापालिका निवडणुकीची पायाभरणी

Power tour of Delhi | शक्तिप्रदर्शनाचा दिल्ली दौरा

शक्तिप्रदर्शनाचा दिल्ली दौरा

कोल्हापूर : महापालिकेतील सर्वपक्षीय ७७ नगरसेवकांपैकी तब्बल ५३ नगरसेवक राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचे निमंत्रण स्वीकारून, दिल्ली वारीला रवाना झाले. महाडिक यांनी आयोजित केलेल्या सहलीला तोकडा प्रतिसाद मिळावा, यासाठी पडद्यामागे घडामोडी घडल्या. दिल्लीवारीच्या निमित्ताने महापालिकेच्या आगामी निवडणुकांची पायाभरणी असल्याची महापालिकेत चर्चा आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व दहा महिन्यांत अशा शक्तिप्रदर्शनाच्या अनेक खेळ्या खेळल्या जाण्याची शक्यता आहे.
थेट पाईपलाईनमधून काहीच हाताला लागले नसल्याने नगरसेवकांतील नाराजीचा फायदा घेत विधानसभा निवडणुकीत प्रा. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी, कॉँग्रेससह शिवसेना, भाजप, जनसुराज्य व अपक्ष अशी मिळून २५ नगरसेवकांनी मोट बांधत, निवडणुकीत वेगळी चूल मांडली. हा प्रयोग यशस्वी झाला. राष्ट्रवादीच्या संमतीने व काँग्रेसमधील नाराजांना घेऊन सत्तांत्तर घडविण्याच्या हालचाली वेगावल्या. मात्र, नव्या सभागृहात सत्तेस्थापनेसाठीच करू, अशी रणनीती राष्ट्रवादीसह प्रा. जयंत पाटील यांनी आखली.
विधानसभेच्या धक्कादायक निकालानंतर ‘बॅकफुट’वर गेलेली काँग्रेस अजून सावरली नाही. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रा. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसह शिवसेना, भाजप, जनसुराज्य व अपक्ष अशा नगरसेवकांनी विरोधाची मोटबांधणी सुरू केली. निवडणुकीत कॉँग्रेस विरुद्ध सर्व अशी निवडणुकीचे रणांगण करण्याची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी-जनसुराज्य यांच्या जोडीला ताराराणी आघाडी रणांगणात असणार आहे. सेना व भाजपची निवडीनंतर साथ घेणार, असेही कारभारीने स्पष्ट केले. यामुळे दिल्लीवारीला महत्त्व आले.

लिटमस टेस्ट
कोणतेही आढेओढे न घेता राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जनसुराज्य पक्ष, अपक्ष व कॉँग्रेसचे असे मिळून तब्बल ५३ नगरसेवक दिल्ली सहलीला तयार झाले. दहा महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीवर विधानसभा निवडणुकीचे सावट असणार आहे. त्यामुळे धास्तावलेल्या नगरसेवकांनी ही निवडणूक ‘चांगल्या बॅनर’खाली लढविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ही दिल्ली सहल येत्या निवडणुकीसाठी ताराराणी आघाडी किंवा राष्ट्रवादीला लिटमस टेस्ट ठरणार आहे. भविष्यात कोण-कोण सोबत येऊ शकते, याची चाचपणी झाली आहे.


गेल्या अनेक वर्षांनंतर नगरसेवक दिल्ली सहलीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. राजकीय मतभेद बाजूला सारून फक्त‘सहल’ या उद्देशानेच दिल्लीला गेलो. यामध्ये कोणतेही शक्तिप्रदर्शन किंवा सत्तांतराचा हेतू नाही.
- राजेश लाटकर (गटनेता- राष्ट्रवादी)


पक्षसंख्याबळअपक्षांचा पाठिंबा
काँग्रेस३३०२
राष्ट्रवादी२६०१
शिवसेना-भाजप ०९०२
जनसुराज्य आघाडी०९०५

एकू ण - ७७ स्वीकृत- ०५

Web Title: Power tour of Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.