पन्हाळ्यातील हजार फूट दरीत उभारली वीजवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:14+5:302021-09-26T04:26:14+5:30

कोल्हापूर : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे जमीनदाेस्त झालेल्या पन्हाळगडावरील नावली व मिठारवाडीला वीज पुरवठा करणाऱ्या ११ के.व्ही. वीज वाहिन्या पुन्हा ...

A power line erected in a thousand feet valley in Panhala | पन्हाळ्यातील हजार फूट दरीत उभारली वीजवाहिनी

पन्हाळ्यातील हजार फूट दरीत उभारली वीजवाहिनी

कोल्हापूर : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे जमीनदाेस्त झालेल्या पन्हाळगडावरील नावली व मिठारवाडीला वीज पुरवठा करणाऱ्या ११ के.व्ही. वीज वाहिन्या पुन्हा उभारण्याचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून पूर्ण केले. येथील खचलेला रस्ता, नागमोडी वळणाच्या पायवाटा, खडाचढ व पाऊस-वारा यांचा सामना करत वीज खांबांची वाहतूक करून हजार फूट खोल दरीत जाऊन हे काम करण्यात आले.

पन्हाळ्यातील ३३/ ११ के.व्ही. उपकेंद्रातून नावली, मिठारवाडी गावठाण व मिठारवाडी शेतीपंप या तीन वाहिन्यांचे वीज खांब व वीज तारा अतिवृष्टी व भूस्खलनामुळे वाहून गेल्या होत्या. या वाहिन्यांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात ३३/११ के.व्ही. केर्ले व सातवे या उपकेंद्रातून सुरू होते. पन्हाळ्यावरील भौगोलिक परिस्थिती, जागेची उपलब्धता, धुके व पावसामुळे नव्या वीज वाहिन्या उभारणे जिकिरीचे होते. कर्मचाऱ्यांनी मात्र या प्रतिकूल परिस्थितीत ५०० किलो वजनाचा एक असे ५ वीज खांब व तारांची वाहतूक तसेच उंच कड्यावरील व दरीतील वीज खांब उभारून वीज वाहिन्या ओढण्याचे काम पूर्ण केले गेले.

अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर ग्रामीण विभाग १ चे कार्यकारी अभियंता दीपक पाटील, उपकार्यकारी अभियंता अमोल राजे, सहायक अभियंता सुलतान शेळके, कनिष्ठ अभियंता प्रवीण पाटील, मुख्य तंत्रज्ञ व जनमित्रांनी ही कामगिरी पार पाडली. त्यासाठी पन्हाळा नगर परिषदेचे सहकार्य लाभले.

--

फोटो नं २५०९२०२१-काेल-पन्हाळा महावितरण०१,०२

ओळ : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे जमीनदोस्त झालेल्या पन्हाळ्यातील दऱ्याखोऱ्यातील वीज वाहिन्या नव्याने उभारण्याचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून पूर्ण केले.

---

Web Title: A power line erected in a thousand feet valley in Panhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.