जनता बझारवर प्रशासकांचीच सत्ता

By Admin | Updated: July 11, 2017 01:11 IST2017-07-11T01:11:46+5:302017-07-11T01:11:46+5:30

जनता बझारवर प्रशासकांचीच सत्ता

The power of the administrators of Janata Bazaar | जनता बझारवर प्रशासकांचीच सत्ता

जनता बझारवर प्रशासकांचीच सत्ता


लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार)च्या दाखल अर्जांच्या छाननीत सोमवारी तब्बल ७१ अर्ज अपात्र ठरले. संचालक मंडळ बरखास्तीमुळे पंधरा जणांना तर बझारकडून माल खरेदी न केल्याने उर्वरित इच्छुकांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले.
बझारचे माजी अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह दिग्गजांना छाननीत झटका बसला असून केवळ तीन अर्ज पात्र ठरले; पण सहकार कायद्यानुसार तीन जागांसाठी निवडणूक झाली तरी परिपूर्ण संचालक मंडळ अस्तित्वात नसल्याने संस्थेवर पुन्हा प्रशासक येऊ शकतो.
जनता बझारच्या १९ जागांसाठी ८२ अर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जांची सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी टी. बी. बल्लाळ यांनी छाननी केली. त्यामध्ये संस्था पोटनियमांनुसार संस्थेच्या दुकानातून किमान पाच हजारांची खरेदी करणाऱ्यांनाच निवडणूक लढविता येणार होती.
संस्थेचा दुकान विभाग
पूर्णपणे बंद असल्याने नवीन इच्छुकांकडे खरेदी पावत्या नसल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. तर बझारच्या बरखास्त संचालक मंडळातील इच्छुकांना सहकार कायद्यानुसार पुन्हा निवडणूक लढविता येत नसल्याने पंधरा जणांचे अर्ज अपात्र ठरविले. केवळ तिघांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.
कायदा काय सांगतो....
तिघे निवडून जरी आले तरी सहकार कायद्यानुसार एकूण जागेच्या दोनतृतीयांश संचालक मंडळ पाहिजे. अन्यथा निवडून आलेले संचालक मंडळ आपोआपच बरखास्त होते. जर या तिघांनी माघार घेतली तर निवडणूक प्रक्रिया रद्द होणार आहे. त्यानंतर पुन्हा बझारवर प्रशासक येऊ शकतो.
छाननीवेळी वाद!
संस्थेची दुकाने बंद असल्याने खरेदी कुठून करायची, असा युक्तिवाद अपात्र ठरविलेल्या इच्छुकांकडून करण्यात आला; पण संस्था पोटनियमांनुसार कारवाई करण्यावर बल्लाळ ठाम राहिल्याने त्यांच्यात व इच्छुकांमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात तणाव निर्माण झाला.
दाद मागण्याची संधी
अपात्र ठरविलेल्या ७१
जणांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णया-
विरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागता येते. तिथे निर्णय कायम राहिला तर उच्च न्यायालयातही दाद मागता
येते. न्यायालयात दाद
मागण्याची तयारी सत्तारूढ
गटाने केली आहे.
मग आम्हाला दुसरा न्याय का?
जिल्हा बॅँकेच्या बरखास्त संचालक मंडळातील बहुतांशी जण पुन्हा संचालक म्हणून कार्यरत झाले. मग आमचे अर्ज कसे अपात्र ठरविले. बँकेच्या संचालकांना एक आणि आम्हाला दुसरा न्याय कसा? असा सवाल उदय पोवार यांनी तिथे केला.
या दिग्गजांना बसला झटका
बझारचे माजी अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण,
त्यांचे सुपुत्र माजी महापौर सागर चव्हाण, सचिन चव्हाण, स्नुषा व नगरसेविका जयश्री सचिन चव्हाण, उद्योगपती
आनंद शंकरराव माने, माजी
उपमहापौर उदय पोवार, स्नेहलता शंकरराव पाटील-शिंगणापूरकर,
मदन चोडणकर, प्रकाश बोंद्रे, किसन कल्याणकर, विजय पोळ.

Web Title: The power of the administrators of Janata Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.